Advertisement

वाढत्या कोरोनामुळं दादरच्या बाजाराचे पुन्हा स्थलांतर?

मुंबईत सध्या दररोज १५००च्या पुढे रुग्णांची नोंद होते आहे. ही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वाढत्या कोरोनामुळं दादरच्या बाजाराचे पुन्हा स्थलांतर?
SHARES

मुंबईत सध्या दररोज १५००च्या पुढे रुग्णांची नोंद होते आहे. ही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही वारंवार करत आहे. मात्र, तरीही याकडं दुर्लक्ष होत आहे. परिणामी महापालिकेनं नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता दादरमधील सतत वर्दळ असलेली भाजी मंडई स्थलांतर करण्याच्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

दादरच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळं गर्दीच्या ठिकाणांवर पालिकेने लक्ष केंद्रित केलं असून नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. दादरचा भाजीबाजार व फुलबाजार रात्री ३ वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू असतो. यावेळी अनेक नागरिक भाजी विकत घेण्यासाठी इथं येत असतात. 

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्शभूमीवर पुन्हा एकदा दादरचा भाजी व फुलबाजार अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाही दादरच्या भाजी आणि फुलबाजारामध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळं कोरोना प्रसाराचा धोका वाढल्यानं या ठिकाणचे भाजी आणि फुलबाजार वांद्रे-कुर्ला संकुल आणि सोमय्या मैदानावर हलवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. याबाबत पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी महापौरांची भेट घेऊन चर्चाही केली.

गतवर्षी जेव्हा कोरोनाचा संसर्ग वाढला होता तेव्हाही दादरचा बाजार वांद्रे-कुर्ला संकुल व सोमय्या मैदानावर हलविण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत आहे. असं असतानाही दादरच्या बाजारात सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी  होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या वेळी हजारो विक्रेते, व्यावसायिक, वाहतूकदार या ठिकाणी येत-जात असतात. त्यामुळं प्रचंड गर्दी होते. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं या ठिकाणाचे भाजी, फुलबाजार वांद्रे-कुर्ला संकुल, सोमय्या मैदानावर हलविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आल्याचं महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या नियमांचं पालन करण्यात येत नसल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावं, वारंवार हात धुवावेत आणि मास्कचा वापर करावा, असं आवाहनही महापौरांनी केलं. लग्न सोहळे, कार्यक्रम, अंत्यविधी-दशक्रिया विधीसाठी गर्दी करू नये, नियम काटेकोरपणे पाळावेत, असं आवाहनही त्यांनी महापौर पेडणेकर यांनी केलं.



हेही वाचा -

कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी, पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश

सरकारी ड्रेस कोडमध्ये बदल, जीन्स चालेल पण टी-शर्ट नाही


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा