Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी, पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश

आता आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी, पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश
SHARES

“आपल्याला भीतीचं वातावरण नाही निर्माण करायचं. मात्र काही दक्षता बाळगून काही बाबतीत पुढाकार घेऊन, आपल्याला जनेतला संकटातून बाहेर देखील काढायचं आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. पण आता आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी”, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिले आहेत.

देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. 

आपल्याला जनेतला संकटातून बाहेर काढायचं आहे. आपल्या जुन्या प्रयत्नांना समाविष्ट करून आपल्याला नवं धोरण आखावं लागणार आहे. जिथं आवश्यक आहे तिथं मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवण्याच्या पर्यायत कोणत्याही परिस्थितीत हयगय होता कामा नये. याशिवाय कोरोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी यावेळी यासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं. ते म्हणाले, लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल.

 हेही वाचा- महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये कोविडचा आकडा सर्वाधिक

हाफकिन बायो फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी जेणेकरून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील-फिनिश (Fill & Finish) बेसिसवर हाफकिनला काम करता येईल, यामधून १२६ दशलक्ष कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचं (maharashtra) काम समाधानकारक असल्याचं आरोग्य सचिवांनी सांगितलं. महाराष्ट्रात आज सरासरी प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र ते आणखीही वाढवावं असं सांगण्यात आलं. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून तो अधिक वाढवून मिळावा. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वांना लसीकरण करावं, अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

(pm narendra modi meeting with maharashtra cm uddhav thackeray on increasing coronavirus in states)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा