Advertisement

आदेश निघाले.., खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत राज्य शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

आदेश निघाले.., खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती
SHARES

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसंच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत राज्य शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

सामाजिक अंतर राखणं सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावं, असंही या आदेशात म्हटलं आहे.

त्याचसोबत नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थितीदेखील ५० टक्के असावी. तसंच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा- पुन्हा एकदा Work From Home, राज्य सरकारच्या नव्या गाईडलाइन्स जारी

आठवड्याच्या सुरूवातीलाच राज्य शासनाकडून कोरोनासंबंधी नवीन गाईडलाइन जारी करण्यात आली होती.

१) नव्या गाइडलाइन्सनुसार कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा work from home साठी उद्युक्त करण्यात येत आहे. आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीचे कर्मचारी वगळता अन्य क्षेत्रातल्या कंपन्यांनी एका वेळी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसला बोलवावं, असं या नव्या कोरोना नियमांमध्ये (new corona rules in maharashtra) म्हटलं आहे.

अन्य कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं. या नियमांचं पालक केलं गेलं नाही तर संबंधित आस्थापना covid-19 ची साथ आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येऊ शकतं, असा कडक आदेश यामध्ये आहे. किमान ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारची सगळी कार्यालयं ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू राहणार.

२) याशिवाय मंदिर, धार्मिक स्थळं अन्य प्रार्थनास्थळांमध्ये जागेनुसार एका वेळी किती लोकांना प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात यावं, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. ऑनलाइन दर्शन, रजिस्ट्रेशन करूनच दर्शन घ्यायची सोय करावी. कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता कुठल्याही स्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता विश्वस्तांनी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

३) मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास थेट दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असंही या आदेशात म्हटलं आहे.

४) हॉटेल, थिएटर सर्व ठिकाणी क्षमतेपेक्षा ५० टक्केच उपस्थिती असावी, असं नव्या नियमात सांगण्यात आलं आहे.

५) लग्नकार्यासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्ती आणि अंत्यसंस्कारांसाठी २० व्यक्तींनाच केवळ परवानगी असेल. या निर्बंधांचं पालन न झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होईल, असं हा नवा आदेश सांगतो.

(only 50 percent employees allowed in private offices as per new covid 19 guidelines in maharashtra)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा