Advertisement

पुन्हा एकदा Work From Home, राज्य सरकारच्या नव्या गाईडलाइन्स जारी

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होतं, तसं लॉकडाउन महाराष्ट्रात (Maharashtra lockdown news) पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.

पुन्हा एकदा Work From Home, राज्य सरकारच्या नव्या गाईडलाइन्स जारी
SHARES

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होतं, तसं लॉकडाउन महाराष्ट्रात (Maharashtra lockdown news) पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

१) नव्या गाइडलाइन्सनुसार कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा work from home साठी उद्युक्त करण्यात येत आहे. आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीचे कर्मचारी वगळता अन्य क्षेत्रातल्या कंपन्यांनी एका वेळी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसला बोलवावं, असं या नव्या कोरोना नियमांमध्ये (new corona rules in maharashtra) म्हटलं आहे.

अन्य कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं. या नियमांचं पालक केलं गेलं नाही तर संबंधित आस्थापना covid-19 ची साथ आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येऊ शकतं, असा कडक आदेश यामध्ये आहे. किमान ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारची सगळी कार्यालयं ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू राहणार.

२) याशिवाय मंदिर, धार्मिक स्थळं अन्य प्रार्थनास्थळांमध्ये जागेनुसार एका वेळी किती लोकांना प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात यावं, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. ऑनलाइन दर्शन, रजिस्ट्रेशन करूनच दर्शन घ्यायची सोय करावी. कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता कुठल्याही स्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता विश्वस्तांनी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

३) मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास थेट दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असंही या आदेशात म्हटलं आहे.

४) हॉटेल, थिएटर सर्व ठिकाणी क्षमतेपेक्षा ५० टक्केच उपस्थिती असावी, असं नव्या नियमात सांगण्यात आलं आहे.

५) लग्नकार्यासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्ती आणि अंत्यसंस्कारांसाठी २० व्यक्तींनाच केवळ परवानगी असेल. या निर्बंधांचं पालन न झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होईल, असं हा नवा आदेश सांगतो.



हेही वाचा

महाराष्ट्रात लाॅकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध- राजेश टोपे

मंत्रालयात एक दिवसाआड येणार कर्मचारी, राज्य सरकारचे नवे आदेश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा