Advertisement

महाराष्ट्रात लाॅकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध- राजेश टोपे

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय नसला, तरी निर्बंध अधिक कठोर केले जातील.

महाराष्ट्रात लाॅकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध- राजेश टोपे
SHARES

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय नसला, तरी निर्बंध अधिक कठोर केले जातील. त्यामुळे राज्यातील जनतेने कोरोना नियमांचं पालन करुन सहकार्य करावं, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील.

राज्यात कोरोना विषाणूचा (coronavirusसंसर्ग होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणं आढळून आलेली नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. असं असलं, तरी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.

हेही वाचा- दिवसाला ३० लाख लसींचा पुरवठा व्हावा, मुंबई महापालिकेची केंद्राला विनंती

संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केलं जात आहे. राज्यात (maharashtra) कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात आहे.

सोबतच नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचं प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं.

(no lockdown in maharashtra but covid 19 rules must be followed strictly says health minister rajesh tope)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा