Advertisement

दिवसाला ३० लाख लसींचा पुरवठा व्हावा, मुंबई महापालिकेची केंद्राला विनंती


दिवसाला ३० लाख लसींचा पुरवठा व्हावा, मुंबई महापालिकेची केंद्राला विनंती
SHARES

मुंबईतील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पाहता पालिका प्रशासनानं केंद्राकड लसीकरण वाढवण्याची परवानगी मागितली आहे. दिवसाला १ लाख लसींप्रमाणे ३० लाख लसींचा पुरवठा व्हावा आणि अतिरीक्त लसीकरण केंद्रे २४ तास चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मुंबई महापालिकेला केंद्राला विनंती केली आहे.

मुंबईत दररोज १ लाख लसीकरणाचं पालिकेच लक्ष्य आहे. त्याकरता जादा लसींचा पुरवठा आणि अतिरीक्त लसीकरण केंद्रे चालवण्याची परवानगी पालिकेनं मागितली होती. सध्या मुंबईत दिवसाला ४५ हजार लोकांचं लसीकरण होतं आहे. सध्या सुरू असणारी लसीकरण केंद्रे ही ८ ते १२ तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. लसीकरण केंद्रे २४ तास कार्यरत झाल्यास दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल असा विश्वास मुंबई महापालिकेला आहे.

आणखी ३० रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठविला आहे. त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. ६० वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण सुरू आहे. मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे ३० लाख आहे. ही बाब लक्षात घेतल्यास तसेच दिवसाला १ लाख व्यक्तींचं लसीकरण झाल्यास साधारणपणं महिनाभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा