Advertisement

राज्य लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर, रविवारी १६,६२० कोरोनाचे नवे रुग्ण

राज्यात कोरोना रुग्ण संख्या रोज वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे.

राज्य लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर, रविवारी १६,६२० कोरोनाचे नवे रुग्ण
SHARES

राज्यात कोरोना रुग्ण संख्या रोज वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. रविवारी राज्यात १६ हजार ६२० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले. मागील दोन महिन्यांतील ही रुग्णवाढ सर्वाधिक आहे. 

राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता विविध शहरांत आणि जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात येत आहे. शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लॉकडाऊनबाबत कडक इशारा दिला आहे. नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास राज्यात कडक लॉकडाऊन लागू शकतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

रविवारी राज्यात ८ हजार ८६१ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २१ लाख ३४ हजार ७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  सध्या १ लाख २६ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९२.२१ टक्के आहे.  सध्या राज्यातील मृत्यू दर २.२८ टक्के आहे.  आतापर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,१४,४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा