मुंबईकरांना दिलासा! १ मेपासून आता प्रत्येक घरात पाणी

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एक मेपासून आता मुंबईतील प्रत्येक घरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामुळे पाणीचोरी आणि बेकायदा पाण्याचे कनेक्शन (Illegal water connection) घेण्याचे प्रकार बंद होतील अशी अशा पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ‘वॉटर फॉर ऑल’ या महत्त्वकांक्षी उपक्रमाची घोषणा सोमवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पालिकेच्या या धोरणानुसार फुटपाथ, रस्ते आणि इत प्राधिकरणांसह सर्वच झोपडीधारकांना पालिकेकडून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान मुंबईतील निवासी इमारतीमधील १९६४ नंतर झालेली अनधिकृत बांधकामे ‘झोपडी नसलेल्या व मोडकळीस आलेल्या इमारती’ वगळून इतर सर्व घरांना नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण निवासी इमराती किंवा त्याचा काही भाग ज्यांचे नकाशे संबंधित विभागानं मंजूर केले नाहीत अशा इमरतींना देखील आता पणी मिळणार आहे.

फूटपाथ आणि रस्त्यावरील झोपडपट्टीधारकांना उभ्या नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. हे नळ सार्वजनिक असतील. साखगी जमिनीवरील अघोषीत झोपडपट्टीधारकांकडून हमीपत्र घेऊन त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

एका नागरी अधिकाऱ्याने नमूद केले आहे की मसुदा धोरणास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. स्थानिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार असून त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

धोरणाद्वारे, 1964 नंतर बांधलेल्या सर्व टोलेटेड संरचना आणि रेल्वे, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचा समावेश असलेल्या केंद्र सरकारच्या जमिनींवरील झोपडपट्टीवासीयांसाठी पाण्याची जोडणी केली जाईल. जमीन मालकांकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास हे होईल.

त्यामुळे अवैध पाणी कनेक्शन आणि चोरीला आळा घालण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. शिवाय, आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच पाणी कनेक्शन दिले जाईल.


हेही वाचा

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेसाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते टाळा

जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड

पुढील बातमी
इतर बातम्या