Advertisement

जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड

असा बहुमान मिळवणारे मुंबई हे भारतातील (India) दुसरे शहर ठरले आहे.

जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड
SHARES

‘वृक्ष नगरी’ अर्थात ‘Tree City’ चा ‘वर्ष २०२१’ साठीचा बहुमान मुंबईला जाहीर करण्यात आला आहे. हा असा बहुमान मिळवणारे मुंबई हे भारतातील (India) दुसरे शहर ठरले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेनं हा सन्माम दिला आहे.

 जागतिक स्तरावरील या गौरवाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केलं आहे. ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत आदित्य ठाकरेंनी दिली.

‘अरबर डे फाऊंडेशन’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी या मुंबई शहराच्या बहुमानानिमित्त लिहिलेल्या विशेष पत्रात मुंबई शहराचं अभिनंदन केलं आहे. तसंच मुंबई शहर हे आता शहरी आणि सामुदायिक वनीकरणात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या जागतिक ‘नेटवर्क’मध्ये सहभागी झाले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्जा मिळवल्याबद्दल त्यांनी मुंबई शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.

उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्रशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जगभरातील शहरांचे मूल्यमापन करण्यात येऊन मुंबईची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भारतातील केवळ हैदराबाद या एकाच शहराला हा बहुमान लाभला आहे. त्यामुळे ‘वृक्ष नगरी’चा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे.



हेही वाचा

मुंबई एप्रिल महिन्यात अधिक तापणार, IMDचा अलर्ट

मुंबईत 'या' कारणामुळे जाणवते तीव्र उष्णता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा