Advertisement

मुंबई एप्रिल महिन्यात अधिक तापणार, IMDचा अलर्ट

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, मुंबईत एप्रिल महिन्यात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे.

मुंबई एप्रिल महिन्यात अधिक तापणार, IMDचा अलर्ट
SHARES

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, मुंबईत एप्रिल महिन्यात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे.

मुंबईसाठी IMD च्या सात दिवसांच्या अंदाजानुसार, २ एप्रिलपर्यंत दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. ६ एप्रिलपर्यंत ते सुमारे ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. तथापि, शहरातील किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

कोकणपट्टीसाठी एप्रिल हा उबदार महिना असेल, विशेषत: मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनंतर, IMD अधिकाऱ्यानं सांगितलं.

याशिवाय, मुंबईसह, उर्वरित कोकण प्रदेशात पुढील चार आठवड्यांत सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे, असं IMDनं म्हटलं आहे.

शुक्रवारी, १ एप्रिल रोजी पहाटे मुंबईकरांना तीव्र उष्णता आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळाला. शिवाय, मुंबई आणि परिसरात एप्रिलमध्ये काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेत आज मुंबईचे कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्यपेक्षा एक अंश कमी आहे. दरम्यान, किमान तापमान २०.२ नोंदवले गेले, जे काल, ३१ मार्च २२.६ अंश सेल्सिअस तापमानापेक्षा दोन अंशांनी कमी होते.

दरम्यान, येत्या महिन्यात महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे एप्रिलमध्ये अधिक तापणार आहेत.

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात तापमान सरासरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची देखील शक्यता आहे, आणि त्याचंही प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उन्हाळ्यात प्रशांत महासागरातील laNina इफेक्ट कायम असणार आहे तर हिंद महासागरात आयओडी न्युट्रल स्थितीत असेल. त्यामुळे येणारा मान्सून देखील चांगला राहण्याची चिन्ह आहे.



हेही वाचा

मुंबईत 'या' कारणामुळे जाणवते तीव्र उष्णता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा