Advertisement

मुंबईत 'या' कारणामुळे जाणवते तीव्र उष्णता

मुंबईतील उष्णतेची लाट कशी प्राणघातक ठरू शकते, जाणून घ्या सविस्तर

मुंबईत 'या' कारणामुळे जाणवते तीव्र उष्णता
SHARES

मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर किनारी भागात कमाल तापमानानं नवीन उंची गाठली आहे.

भारतीय हवामान खात्यानं मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि बुधवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. शुक्रवारी कमाल तापमान ३९.४अंश नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा आठ अंशांनी जास्त होते.

पुढील काही दिवस उष्ण हवामानाची (Heat Wave) स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. तर रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

तापमानात (temperature) वाढ झाल्यास आणि मैदानी भागात कमाल तापमान ४० अंश, डोंगराळ भागात ३० अंश आणि किनारपट्टीच्या प्रदेशात ३७ अंशांपेक्षा जास्त असल्यास क्षेत्र उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली मानले जाते.

जेव्हा कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५ ते ६ अंश जास्त असते तेव्हा IMD उष्णतेची लाट घोषित करते. जेव्हा एखाद्या प्रदेशात ४५-४७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाते तेव्हा ते उष्णतेची लाट म्हणून घोषित करतात.

काही प्रदेश उष्णतेची लाट का अनुभवतात?

वायव्य भारतातून उष्ण आणि कोरडे वारे वाहण्याची शक्यता असल्यास, प्रचलित स्वच्छ आकाश आणि कमी आर्द्रता मूल्ये यामुळे पारा वाढतो आणि परिणामी काही दिवसांसाठी तीव्र उष्णतेची लाट येते, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.  

सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आणि मध्य आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळेही पारा वाढला आहे.

मुंबईत उष्णतेची लाट का आहे?

मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आहे कारण हा प्रदेश गुजरातच्या सौराष्ट्र-कच्छ प्रदेशांमध्ये प्रचलित उष्णतेच्या लाटेच्या थेट प्रभावाखाली आहे.

“वायव्य भारतातून येणारे उष्ण आणि कोरडे वारे कोकणच्या काही भागात पोहोचत आहेत. याव्यतिरिक्त, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर समुद्राच्या वाऱ्याची संथ गती आणि एकूणच स्वच्छ आकाशाची परिस्थिती एकत्रितपणे यामुळे उष्ण परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यानं इंडियन एक्सप्रेसला दिली.

अधिका-यांनी देखील तापमानात अचानक वाढ होण्याचे कारण सौर किरणोत्सर्गाच्या वाढीव तीव्रतेला दिले आहे, जे वर्षाच्या या वेळी उष्णकटिबंधीय प्रदेशांसाठी सामान्य आहे.

३ मार्चपासून शहरात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. १२ मार्च आणि १३ मार्च रोजी स्थिती अधिक तीव्र झाली. १७-२० मार्च दरम्यान, दिवसाचे तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

उष्माघात घातक ठरू शकतो?

  • उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना सुरक्षित आणि हायड्रेटेड राहण्याचे आणि दुपारी बाहेर पडणं टाळण्याचे आवाहन केले आहे.
  • उष्माघातानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात यावं, असंही त्यात म्हटलं आहे.
  • तसंच नागरिकांना पाणी आणि इतर निरोगी द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याचे आवाहन केले आहे.
  • तसंच लोकांना उन्हात बाहेर जाणे टाळण्यास सांगितले आहे, विशेषत: दुपारी १२ ते ३ या वेळेत आणि लोकांनी दुपारी बाहेर जाताना पाणी घेऊन जाण्याची सूचना केली आहे.
  • पालिकेनं असंही सुचवलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला सनस्ट्रोकचा त्रास होत असेल तर त्यानं सावलीत थंड ठिकाणी झोपावं. अशा रुग्णाला तात्काळ हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. कारण उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.



हेही वाचा

मुंबईला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा