Advertisement

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेसाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते टाळा

राज ठाकरेंच्या सभेमुळे वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या पर्यायी मार्ग

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेसाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते टाळा
SHARES

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा मंगळवारी ठाण्यातील डॉ. मूस मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यातील (Thane) मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. राज ठाकरेंच्या सभेमुळे वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे वाहतूक बदल दुपारी ३ ते सभा संपेपर्यंत कायम राहणार आहेत.

  • ठाणे स्थानक इथून डॉ. मूस चौकातून गडकरी रंगायतनच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना नौका विहार इथं प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं शिवाजी पथमार्गे जांभळीनाका येथून जातील.
  • टेंभीनाका, टॉवरनाका इथून गडकरी रंगायतनच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना चिंतामणी चौक इथं प्रवेशबंदी असेल. इथली वाहनं चिंतामणी चौक इथून टेंभीनाका, चरईमार्गे जातील.
  • गजानन महाराज चौक येथून राम मारूती रोड, गडकरी रंगायतनच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौक इथं प्रवेशबंदी असेल. इथली वाहनं राम मारूती रोड मार्गे गोखले रोड इथून जातील.
  • खंडू रांगणेकर चौक इथून गोविंद बच्छाजी मार्गे गडकरी रंगायतनच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना आम्रपाली हॉटेल इथून वळण घेण्यास प्रवेशबंदी असेल. इथली वाहनं चिटणीस रुग्णालयाकडून जातील.
  • एदुलजी रोड इथून चरई मार्गे गोविंद बच्छाजी मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना दगडी शाळा इथं प्रवेशबंदी असेल. इथली वाहनं चिटणीस रुग्णालय इथून डावीकडे वळण घेऊन टेंभीनाक्याच्या दिशेनं जातील.
  • मुंबईहून सभेसाठी येणाऱ्या बसगाड्या तसंच इतर वाहनांना तीन हात नाका इथं थांबवण्यात येईल. त्यानंतर कार्यकर्त्ये चालत सभास्थानी जातील. तर वाहनं आनंदनगर जकातनाका इथं उभी केली जातील.
  • कल्याण डोंबिवली भागातूनही सभेसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असणार आहे. कोर्टनाका इथं वाहन आल्यानंतर कार्यकर्ते वाहनांतून उतरतील. कोर्ट नाका आणि तीन हात नाका येथे वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.
  • गोखले रोड, राम मारूती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पथ, टेंभीनाका, तलावपाली परिसर, कोर्ट नाका, कळवा पूल, मुंबई नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, कोपरी पूल, नितीन कंपनी या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पुन्हा गाजणार

राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो समोर, अमित ठाकरे म्हणाले…

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा