Advertisement

ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पुन्हा गाजणार

आता आज १२ एप्रिल ठाणे इथं राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पुन्हा गाजणार
SHARES

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीसमोर हनुमान चालिसा लावा असा आदेश दिला होता. यानंतर सर्वच थरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेचे नेतेही अडचणीत आले होते. त्यानंतर आता आज १२ एप्रिल ठाणे इथं राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी एक सूचक ट्विट (Tweet) केलं आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून 'लाव रे तो व्हिडिओ' पुन्हा गाजणार असल्याचं म्हटलं आहे. राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर ज्यांना "लाव रे तो व्हिडिओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्यासाठी आजची सभा खास असल्याचं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या सभेत राज ठाकरेंच्या स्वागतासाठी २०० बाईक्स असतील. यासोबतच पालघर इथून ६०×४० फूट हनुमान ध्वज आणणार आहे. सभेसाठी नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते ठाण्यात येणार आहेत.

ठाण्यातील तलावपाळी येथे आज संध्याकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे. मनसेकडून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या आवाजातील एक टीझर देखील मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल केला. खासकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर राज ठाकरेंनी निशाणा साधला.

इतकेच नाही तर हिंदुत्ववादी भूमिका स्पष्टपणे मांडत इतर विषयांवरही भाष्य केलं. राज ठाकरेंच्या या भाषणाची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत झाली आणि विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. याच सर्व प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी आजची सभा आयोजित केली आहे.

खरे तर ठाण्यात राज ठाकरे यांची सभा ९ एप्रिलला होणार होती. मात्र, तळोपाळी येथे बैठक घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. मात्र पोलिसांनी या ठिकाणी ९ रोजी मेळाव्यास परवानगी नाकारली. त्यामुळे ही बैठक आता १२ तारखेला म्हणजेच आज होणार आहे.



हेही वाचा

किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक होण्याची शक्यता

"मी माझ्या साहेबांसोबत", राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा