Advertisement

किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक होण्याची शक्यता

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक होण्याची शक्यता
SHARES

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण सोमय्यांचा अकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांच्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणाचा दोन तासांपासून युक्तीवाद सुरू होता. नील सोमय्यांच्या (Neel Somaiya) अटकपूर्व जामीनावर उद्या सुनवाणी होणार आहे.

सोमय्यांनी जो पैसा गोळा केला त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलावर आहे.

कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आम्ही आता हायकोर्टात दाद मागणार आहोत अशी माहिती किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी दिली आहे.

किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली.

आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.



हेही वाचा

सिल्व्हर ओक हल्लाप्रकरण: मुंबई पोलिसांची सायबर सेलकडे धाव

"मी माझ्या साहेबांसोबत", राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा