थर्टी फर्स्टला दुकानं रात्रभर सुरू ठेवा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसहित इतर शहरांतील दुकाने ३१ डिसेंबरच्या निमित्ताने रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आदित्य यांनी ही मागणी केली आहे.

प्रस्ताव पडून

मागील अनेक महिन्यांपासून राज्य शासनाच्या गृह विभागाकडे मुंबईसहित इतर शहरांतील दुकाने २४/७ सुरू ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव पडून असल्याची आठवण देखील आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना या पत्रातून करून दिली आहे. अद्याप या प्रस्तावावर शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मिळेल जास्त महसूल

''दुकानं रात्रभर सुरू राहिल्यास सरकारला जास्त महसूल मिळू शकेल आणि तरूणांच्या हाताला रोजगारदेखील उपलब्ध होऊ शकेल. जो व्यवसाय दिवसा केला जातो, तो रात्रीच्या वेळेस अनधिकृत ठरू शकत नाही. त्यामुळे दुकाने २४/७ सुरू राहिल्यास माॅलला सुगीचे दिवस येतील आणि हा निर्णय राज्यासाठी लाभकारक ठरू शकेल'', असंही आदित्य म्हणाले.


हेही वाचा-

मनोरा आमदार निवासावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हातोडा

फर्निचरचं काम पडलं महागात, सुतारानं ४ लाखांचं सोनं लांबवलं


पुढील बातमी
इतर बातम्या