SHARE

घरातील फर्निचरचं काम देण्यात आलेल्या सुतारानेच घरातून चार लाख रुपयांचं सोनं लांबवल्याची घटना सायन परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायन पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


काम पाहण्याचा बहाणा

सायनच्या मानव सेवा संघ परिसरात ६१ वर्षीय वृद्धा मुलासोबत राहते. मुलगा आणि सून डाॅक्टर  असून त्यांचा मालाड परिसरात दवाखाना आहे. दोघेही सायंकाळी दवाखान्यात असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी दवाखान्यात फर्निचरचे काम केलं होतं.  घरही फर्निचरचं काम करायचं असल्यामुळं डाॅक्टर मुलाने घरचा फोन नंबर देऊन आईशी बोलून कामाची पाहणी करण्यास त्या सुताराला सांगितलं. त्यानुसार मागील शुक्रवारी काम पाहण्यासाठी सायन येथील डाॅक्टरच्या घरी सुतार गेला.  घरी आई एकटीच असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने काम पाहण्याच्या बहाण्याने घराची रेकी केली.


सामानासाठी ६ हजार घेतले

त्यावेळी त्याने डाॅक्टर दाम्पत्याच्या तिजोरीतून साडेचार लाखांचे दागिने लंपास केले. त्यानंतर सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून वृद्ध महिलेकडून सामानासाठी ६ हजार रुपये घेतले. त्यानंतर मात्र तो सुतार परतलाच नाही. त्याचा फोनही लागत नव्हता. रात्री डाॅक्टर दाम्पत्य घरी आल्यानंतर त्यांना तिजोरीत दागिने दिसले नाहीत. त्यांनी सायन पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा शोध घेत आहेत. हेही वाचा - 

तुर्भे स्थानकावर महिलेसमोर हस्तमैथुन

दुचाकी चोरणारे बंंटी-बबली अटकेत; ९ दुचाकी हस्तगत
संबंधित विषय
ताज्या बातम्या