दुचाकी चोरणारे बंंटी-बबली अटकेत; ९ दुचाकी हस्तगत


दुचाकी चोरणारे बंंटी-बबली अटकेत; ९ दुचाकी हस्तगत
SHARES

मुंबईच्या देवनार परिसरात दुचाकी चोरणाऱ्या एका बंंटी-बबली या जोडीला मानखुर्द पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. रफीक शेख (२७), झरीन शेख (२९) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल ९ दुचाकी (अॅक्टिवा) हस्तगत केल्या असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. 


सीसीटीव्हीत चोरी उघड

मुंबईच्या देवनार, मानखुर्द, परिसरातून मागील अनेक दिवसांपासून फक्त अॅक्टिवा दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारीत वाढ झाल्या होत्या. वेळोवेळी पोलिसांनी त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना चकवा देण्यात ते यशस्वी होत होते. त्या परिसरातील सीसीटीव्हीतही त्यांचा चोरी आढळून येत नव्हते. इतके ते सराईत होते. अखेर एका सीसीटीव्हीत एक महिला संशयितरित्या दुचाकी ढकलून पुढे नेत असल्याचं दिसून आलं. त्या महिलेच्या प्रत्येक हालचालीवर पोलिस कॅमेऱ्याने लक्ष ठेवून होते. काही अंतरावर त्या महिलेने ढकलून आणलेली दुचाकी एका व्यक्तीने वायर सोडवून सुरू केली आणि दोघांनी पळ काढला. पोलिसांनी या सीसीटीव्ही चित्रीकरणाऱ्या माध्यमातून या बंटी-बबलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. 


रंगेहाथ पकडलं

अखेर देवनार येथे दुचाकी चोरताना या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. त्याच्या चौकशीतून पोलिसांनी त्यांनी चोरलेल्या ९ दुचाकी अॅक्टिवा हस्तगत केल्या आहेत. अॅक्टिवा गाड्या जास्त करून महिला चालवतात. त्यामुळे महिलेने गाडी पुढे आणल्यास कुणालाही संशय येणार नाही. म्हणून झरीन पार्किंगमधील दुचाकी पुढे घेऊन रफीकच्या ताब्यात द्यायची. त्यानंतर रफीक दुकाचीतील वायर सोडवून ती दुचाकी सुरू करून चोरायचा. या दोघांवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात गाडी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचं तपासात पुढे आलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  



हेही वाचा - 

जादूटोणा केल्याच्या आरोपावरून चौघांनी केली एकाची हत्या

भाडेकरू मुलीचं केलं अश्लील चित्रीकरण, गिरगावमधील घरमालकाला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा