भाडेकरू मुलीचं केलं अश्लील चित्रीकरण, गिरगावमधील घरमालकाला अटक

मुंबईबाहेरून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ३ मुली गिरगाव परिसरातील मेहुल मेहता (नाव बदललेलं आहे) यांच्याकडे भाडेकरू म्हणून जून २०१८ पासून रहात होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या तिघी एकांतात ज्या काही गोष्टींबाबत चर्चा करायच्या त्याची माहिती मेहता यांच्या मुलाला कळायची. त्यावरून तो त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा.

भाडेकरू मुलीचं केलं अश्लील चित्रीकरण, गिरगावमधील घरमालकाला अटक
SHARES

दक्षिण मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलीचं छुप्या कॅमेऱ्याने अश्लील चित्रीकरण करणाऱ्या एका उच्चभ्रू घर मालकाच्या मुलाला डी.बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईबाहेरून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ३ मुली गिरगाव परिसरातील मेहुल मेहता (नाव बदललेलं आहे) यांच्याकडे भाडेकरू म्हणून जून २०१८ पासून रहात होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या तिघी एकांतात ज्या काही गोष्टींबाबत चर्चा करायच्या त्याची माहिती मेहता यांच्या मुलाला कळायची. त्यावरून तो त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा.

रूममध्ये छुपा कॅमेरा

आठवड्याभरापूर्वी या मुलींना आपल्या रुममध्ये एक पडदा बांधला होता. त्यावेळी आरोपी मालकाच्या मुलाने तिथं जाऊन मुलींना हा पडदा काढण्यासाठी सांगितलं. अॅडप्टरला सिग्नल मिळत नसल्याने टीव्ही चालत नसल्याचा बहाणा त्याने केला. मुलींनी संबंधीत अॅडप्टरचं नाव गुगलवर सर्च केलं असता तो केवळ अॅडप्टर नसून एक छुपा कॅमेरा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

मोबाइलमध्ये चित्रीकरण

हा छुपा कॅमेरा त्याने ऑनलाईन मागवला होता. त्यात सुईच्या आकाराचा कॅमेरा असून त्यातून आवाजासह चित्रीकरण होत होतं. याबाबत मुलींनी डी.बी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला. तेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये छुप्या कॅमेऱ्याचं चित्रीकरण असल्याचं पोलिसांना आढळलं.

या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला याप्रकरणी जामिन मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसंच त्याचा मोबाइल तपासासाठी न्यायावैधक प्रयोगशाळेत पाठवला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा-

मूल होत नसल्याने मुलीचे अपहरण, २ महिलांना अटक

अाॅईलच्या नावाखाली ३० लाखांचं पाणी विकलं, नायझेरियनला अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा