मूल होत नसल्याने मुलीचे अपहरण, २ महिलांना अटक


मूल होत नसल्याने मुलीचे अपहरण, २ महिलांना अटक
SHARES

भायखळा रेल्वे स्थानकावरून काही दिवसांपूर्वी ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मुलीचं अपहरण करणाऱ्या दोन महिलांना पकडण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आलं आहे. जावेला मूल होत नसल्यामुळे त्या दोघींनी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसाना दिली आहे.


भायखळा स्थानकातून बेपत्ता

भायखळा पश्चिमेला रेल्वे स्थानकावर १६ डिसेंबर रोजी तक्रारदार महिला तिच्या मुलींसोबत बहिणीची वाट पाहत होती. त्यावेळी स्थानक परिसरात तिच्या मोठ्या मुलीसह तीन वर्षाची दुसरी मुलगीही खेळत होती. मात्र ती अचानक फलाटावरून दिसेनाशी झाली. तक्रारदार महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीचा सर्व ठिकाणी शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर महिलेने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. 


 हैदराबादमध्ये मुलगी 

 पोलिसांनी भायखळा ते कल्याण सर्व स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसंच तांत्रिक गोष्टींची मदत घेत, बेपत्ता मुलगी  हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आग्रीपाडा पोलिसांच्या पथकाने हैदराबाद मुलीला ताब्यात घेत एका महिलेला अटक केली. या महिलेच्या चौकशीतून मुख्य आरोपी महिला पुण्यात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेलाही अटक केली. जावेला मूल होत नसल्यामुळे या मुलीचे अपहरण करून तिला तिच्याकडे सोपवल्याची कबुली दोन्ही महिलांनी दिली आहे.



हेही वाचा -

अाॅईलच्या नावाखाली ३० लाखांचं पाणी विकलं, नायझेरियनला अटक

लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मित्राची हत्या




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा