लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मित्राची हत्या

अब्दुल घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतल्याचे कळाल्यानंतर आरोपींनी अब्दुलच्या घरी फोन करून खंडणीसाठी धमकावले. तोपर्यंत साकीनाका पोलिसांनी तपास सुरू केला होता. खंडणीसाठी आलेल्या मोबाइलचे सीडीआर काढले असता हा मोबाइल साकीनाका परिसरात अ‍ॅक्टिव्ह होता.

लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मित्राची हत्या
SHARES

साकीनाका परिसरात पाॅर्न साईट पाहून आपल्याच अल्पवयीन मित्रावर अत्याचार करत, ही बाब त्याने कुणालाही सांगू नये म्हणून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सोळा वर्षांच्या आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली आहे. या दोघांवर साकीनाका पोलिसांनी  अपहरण, हत्या, अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह हत्येचा पुरावा नष्ट करणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 


बॅगेत मृतदेह टाकला

साकीनाकाच्या एलबीएस नगर परिसरात राहणारा मृत अब्दुल खान (नाव बदललेले आहे.) हा पाचवीत शिकत होता. दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणारा सोळा वर्षांचा आरोपी मुलगा अब्दुलच्या घरी आला होता. खेळायला जाऊ या बहाण्याने त्याने अब्दुलला घराबाहेर आणत स्वत:च्या घरी नेले. घरी त्यांच्याबरोबर अाणखी एक मित्र होता. घरी पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर त्या दोघांनी अब्दुलवर घरातील पोटमाळ्यावर अत्याचार केला. यावेळी अब्दुलने आरडाओरड करत घरातल्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी अब्दुलची गळा आवळून हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी एका बॅगेत मृतदेह टाकला. ही बॅग दुचाकीवर घेऊन ९० फूट रस्त्याजवळील एका नाल्याजवळ बॅग टाकून दिली.


खंडणीसाठी धमकावले

अब्दुल घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतल्याचे कळाल्यानंतर आरोपींनी अब्दुलच्या घरी फोन करून खंडणीसाठी धमकावले. तोपर्यंत साकीनाका पोलिसांनी तपास सुरू केला होता.  खंडणीसाठी आलेल्या मोबाइलचे सीडीआर काढले असता हा मोबाइल साकीनाका परिसरात अ‍ॅक्टिव्ह होता. मात्र, नंतर सिमकार्ड काढून मोबाइल बंद करण्यात आला होता. पोलिसांनी एका सोळा वर्षाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.


शोध घेण्याचे नाटक 

 मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून त्याने अब्दुलच्या वडिलांना खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर हे प्रकरण सर्वासमोर आले. विशेष म्हणजे अब्दुलच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून आल्यानंतर बेपत्ता अब्दुलचा शोध घेण्यासाठी आरोपी पोलिसांसोबत त्याचा शोध घेण्याचे नाटक करत होता. या दोन्ही अल्पवयीन आरोपींची पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी केला आहे.



हेह वाचा- 

बनावट ड्रायव्हिंग लायसन्स देणारी टोळी गजाआड

करचुकवेगिरीप्रकरणी महालक्ष्मी रेसकोर्सवरील १८ सट्टेबाजांना अटक




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा