अफगणिस्तातानात तालिबानी राजवट, भारतीयांना बसणार महागाईची झळ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर आता तिथल्या परिस्थितीचा परिणाम भारतीय बाजारावरही होताना दिसून येतोय. मुंबईत सुक्या मेव्याचे भाव वाढले आहेत. अफगणिस्तानानत तख्तापालट होण्यापूर्वी मुंबईत बदामाची किंमत 600 रुपये किलो होती.

मात्र, आता अफगाणीस्तानातील बदलांमुळे मुंबईत बदामांची किंमत ८०० ते ९०० रुपये किलो झाली आहे. याशिवाय बाजारात काजू, पिस्ता आदींची किंमत वाढली आहे. येत्या काही दिवसांत हे भाव अजून वाढण्याची शक्या व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात होणाऱ्या घडामोडीचे परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होताना दिसत आहेत.

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, सुक्या मेव्याच्या किंमती वाढल्या आहेत. पावसाळ्यात आणि रक्षाबंधनामुळे सुक्या मेव्याची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठ्याअभावी किमतींमध्ये सुमारे ७-१२ टक्के वाढ दिसून येत आहे. एका आठवड्यात दर २००-२५० रुपयांनी वाढले आहेत.

जम्मूमधील ड्राय फ्रूट्स रिटेलर असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योती गुप्ता यांच्या मते, गेल्या १५-२० दिवसांपासून अफगाणिस्तानमधून आयात प्रभावित झाली आहे.

"१० दिवसांच्या आत २५० रुपये प्रति किलोग्रामपर्यंत भाव वाढण्याचे कारण ग्राहकांना समजावून सांगणं खूप कठीण आहे. पण आम्ही असहाय्य आहोत. ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, मी परिस्थितीनुसार दर सूची सुधारित केली आहे," एएनआयच्या हवाल्यानं गुप्ता म्हणाल्या.

गुप्ता पुढे म्हणाल्या की, सणासुदीच्या काळात आणि सध्याच्या साथीच्या रोगामुळे सुका मेव्यांची मागणी जास्त आहे.

"आम्ही बदाम, अंजीर, जर्दाळू, पिस्ता, जिरे यासारख्या अनेक वस्तू अफगाणिस्तानातून आयात करतो. रोगराईमुळे अंजीरांची मागणी विशेषतः जास्त आहे, कारण रोग प्रतिकारशक्ती त्यामुळे वाढल्याचं सांगितलं जातं. परंतु आता आयात थांबल्यानं किंमती वाढल्या आहेत,” असं गुप्ता म्हणाल्या.

अफगाणिस्तान बदाम, अंजीर, जर्दाळू आणि मनुका यांचे भाव प्रति किलो २००-३०० रुपयांनी वाढले आहेत, तर पिस्ताच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

  • अफगान बदाम : ६०० रुपये/किलो आता ८००-९०० रुपये/किलो
  • मुनुका : ५५० रुपये/किलो आता ७५० रुपये/किलो
  • अंजीर : ८००/किलो पासून ते आता १०००/किलो
  • जर्दाळू: ४०० रुपये/किलो ते आता ६०० रुपये/किलो
  • पिस्ता: १७५०/किलो पासून ते आता २०००/किलो

दिल्लीच्या घाऊक आणि किरकोळ बाजारातही सुक्या माव्याच्या किमती वाढल्या आहेत. इंडो-अफगाण चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कंवरजित बजाज म्हणाले की, किमतीवर परिणाम झाला आहे, सध्या दिल्ली आणि आसपासच्या भागात किमती ५-१०% वाढल्या आहेत. जर ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर ते कठीण होऊ शकते.

याआधी रविवारी, अफगाणिस्तान सरकार कोलमडून पडले, ज्यात राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला आणि तालिबाननृं राजधानी काबूल शहर ताब्यात घेतलं.


हेही वाचा

मुंबईत शिकणाऱ्या अफगणिस्तान विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

मराठी तरूणांना जागतिक स्पर्धेत उभं राहण्यासाठी पुढाकार घ्या- उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या