Advertisement

मराठी तरूणांना जागतिक स्पर्धेत उभं राहण्यासाठी पुढाकार घ्या- उद्धव ठाकरे

एकमेकांना सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली.

मराठी तरूणांना जागतिक स्पर्धेत उभं राहण्यासाठी पुढाकार घ्या- उद्धव ठाकरे
SHARES

कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांना सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संवादाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणूस जगातील विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदापर्यंत पोहचला आहे. आपल्या कौशल्याने त्या-त्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लावतो आहे. तुम्ही आता जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, त्याची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. 

महाराष्ट्रात शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग संकल्पना यांच्या स्वागताचे धोरण आहे. त्यातून विदेशातील मराठी उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन समन्वयासाठी प्रयत्न करेल. शिक्षणामध्ये आम्ही नवनवे प्रयोग करत आहोत. मुंबई मनपा शाळांच्या गुणवत्तावाढीमुळे आता प्रवेशासाठी रांग लागू लागली आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचंही स्वागत केलं जाईल. 

हेही वाचा- राज्यपालांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचं कारण काय?, दरेकरांचा नवाब मलिकांना सवाल

आपला शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आपल्या आयुष्याची गुंतवणूकच शेतीत करतो. पण तो पावसाच्या अनियमिततेमुळे हताश होतो. त्याला कधी दुष्काळाचा, तर कधी अतिवृष्टीचा फटका बसतो. मेहनती शेतकऱ्याला या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या मालाला हमी नव्हे तर हमखास भाव मिळेल. त्याच्यासाठी चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध होईल. उद्योग जसा आखीव-रेखीव असतो, तसेच त्याला संघटीत करण्याचा प्रय़त्न आहे. त्याला दर्जेदार-गुणवत्तेचा पीक घेण्यासाठी प्रशिक्षित करावे लागणार आहे. ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम भोगतो आहे. त्यासाठी आता आम्ही आपण ई-व्हेईकल्सचं धोरणही आणलं आहे.

 अशा कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा, औषध या क्षेत्रात आपल्याला एकत्र येऊन काम करता येईल. त्यासाठीच्या सूचना, नव्या प्रकल्प, संकल्पांचे स्वागत आहे. मराठी माणूस काय करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. आता महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे प्रयत्न करू. तुम्ही भरारी घेतली आहे, आता नव्या पिढीतील तरुणांना गरुड भरारीसाठी पंख देण्यासाठी पुढे या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, कोरोनाचं मोठे संकट असतानाही महाराष्ट्रात उद्योग, व्यापाराची चक्रे अविरत सुरु राहीली. जगभर विखुरलेल्या उद्योजकांच्या कल्पनांचे, संकल्पनांचे स्वागतच आहे. उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी आम्ही पायघड्या घातल्या आहेत. त्यासाठीच्या विविध धोरणांचीही मंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा