Advertisement

डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याचा दावा करणारे राजकारणी थापाडे- सायरस पूनावाला

लसीकरणामुळे मृत्यूसंख्या आटोक्यात येत असली, तरी मृत्यूदर वाढल्यावरच लाॅकडाऊन लावण्यात यावा, असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी मांडलं.

डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याचा दावा करणारे राजकारणी थापाडे- सायरस पूनावाला
SHARES

भारतातील सर्व नागरिकांना डिसेंबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसी देऊ, असं आश्वासन देणारे राजकारणी हे थापाडे आहेत. सध्याच्या घडीला कोरोना लसीचे दोन्ही डोस देखील पुरेसे नसून तिसरा बुस्टर डोस आपल्याला घ्यावा लागेल. लसीकरणामुळे मृत्यूसंख्या आटोक्यात येत असली, तरी मृत्यूदर वाढल्यावरच लाॅकडाऊन लावण्यात यावा, असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी मांडलं.

सायरस पूनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी देशातील लसीकरण मोहीम, लॉकडाऊन आणि सरकारी धोरणांवर परखडपणे भाष्य केलं. ते म्हणाले, सीरम कोविशील्ड लसीचं उत्पादन करत असल्याने सर्वांनाच असं वाटतं की आम्हाला सर्वाधिक, सर्वात पहिल्यांदा लसी मिळाव्यात. आम्ही एकेकाळी २० लसी बनवायचो, ज्यांची संख्या १५ कोटी इतकी होती.

पण आता इतर लसींचं उत्पादन कमी करून आम्ही एकट्या कोरोना लसीचं उत्पादन १० कोटींवर घेऊन गेलो आहे. हे सोपं काम नाही. यामध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. महिन्याला १० कोटी प्रमाणे वर्षाला ११० ते १२० कोटी लसी होतील. आपली गरज आणि इतर कंपन्या तयार करत असलेल्या लसींची आकडेवारी लक्षात घेतल्यास राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात, असं पूनावला म्हणाले.

हेही वाचा- खासगी रुग्णालयांकडून लस घेण्याचा राज्य सरकारचा विचार

कोरोना प्रतिबंधक लसीच्या क्षमतेबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ६ महिन्यानंतर व्यक्तीच्या शरीरातल्या अँटीबॉडीज कमी होतात. त्यामुळं दोन डोसनंतर तिसरा बूस्टर डोस गरजेचा आहे. लस उपलब्ध नसल्यामुळं सरकारने ८४ दिवसांची अट घातली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास कदाचित बुस्टर डोसनतर पुन्हा लस घ्यायला लागू शकते.  

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सामुदायिक रोग प्रतिकारशक्ती आणि लसीचं संरक्षण असल्यानं तिसरी लाट आली तरी तिची तीव्रता कमी असेल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सातत्याने लॉकडाऊन लावण्यात येत आहे. परंतु कोरोनातील मृत्यूदर जास्त असल्यावरच लाॅकडाऊन लावण्यात यावा, असं मतही पुनावाला यांनी व्यक्त केलं.

पुण्यामध्ये कोरोनावाढीच प्रमाण जास्त असल्याचं अहवालामधून दिसल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणा केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याची माहितीही सायरस पूनावाला यांनी दिली. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा