Advertisement

मुंबईत शिकणाऱ्या अफगणिस्तान विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

पुणे आणि मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबईत शिकणाऱ्या अफगणिस्तान विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट
SHARES

पुणे आणि मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचा आपल्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत नातेवाईकांशी संपर्क करुण देणं आणि महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत आदित्य ठाकरे आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा झाली.

अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात एकूण ५ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. आम्हाला मदतीची गरज आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता आम्हाला भारतानं आश्रय दिला पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच तालिबाननं अफगाणीस्तानात प्रवेश केला आहे. आम्ही आदित्य ठाकरे आणि सरकारचे आभारी आहोत. त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला, आमच्या समस्या ऐकल्या. आम्ही सरकारची भेट घेतली कारण आम्ही तालिबानचा विरोध करतो. अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे. महिला सुरक्षित नाहीत. आमचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षा मिळू द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, काही विद्यार्थ्यांचा व्हिसा संपत आहे, तर काही विद्यार्थ्यांचा व्हिसा अजून दोन-तीन वर्षांसाठी आहे. व्हिसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू. केंद्र सरकारपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रश्न पोहोचवणार आहे. ३ हजार ५०० ते ४ हजार अफगाणी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.

भारताने आपले व्हिसा नियम बदलले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. या व्हिसाला ई-आणीबाणी X-Misc व्हिसा असं म्हटलं आहे. भारतात येण्यासाठी व्हिसा अर्ज फास्ट ट्रॅक करणं हा त्याचा हेतू आहे.

व्हिसाशी संबंधित समस्यांसाठी असलेल्या नोडल मंत्रालयानं या नवीन व्हिसासंदर्भात मंगळवारी घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी देखील गृह मंत्रालयाकडून ट्विट करून सांगण्यात आली आहे.



हेही वाचा

विजय मल्ल्याच्या किंशफिशर हाऊसची ५२ कोटींना विक्री

बुलेट ट्रेनच्या विषयावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार- रावसाहेब दानवे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा