'नो पार्किंग'विरोधात वाहतूकदार संघटनांनी एकत्र येऊन लढा द्यावा- शरीफ देशमुख

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत दररोज शेकडो वाहनांची भर पडत असून आता ही संख्या ३३ लाख ५२ हजारांवर गेली आहे. वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यानं अनेक जण रस्त्याच्या कडेला अवैधरित्या पार्किंग करतात. त्यामुळं मंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीवर आणि अवैध पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, या कारवाई विरोधात सर्व वाहतूकदार संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचं आवाहन नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांनी केलं आहे.

प्रतिदिन विलंब आकारणी

'बेकायदा पार्किंग केलेले वाहन टोइंग केल्यानंतर मालकी हक्काचा दावा मालकाकडून सांगण्यात येईपर्यंत प्रतिदिन विलंब आकारणी लावली जाणार आहे. संबंधित वाहन जर मालकाने ३० दिवसांच्या आत सोडवून नेले नाही तर ते बेवारस समजून त्याची लिलावात विक्री करण्यात येणार आहे. पालिकेच्या या कठोर निर्णयाविरोधात सर्वच स्तरांतून आवाज उठणे गरजेचं आहे', असं शरीफ देशमुख यांनी म्हटलं आहे.

दंड वसूल

'पालिकेनं सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटर अंतराच्या आत पार्किंग केल्यास ७ जुलैपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ट्रक, बससारख्या अवजड वाहनांना टोइंग शुल्क ५ हजार, दंड १० हजार, विलंब केल्यास किमान ११ हजार दंड निश्चित केला आहे. यामध्ये मोठ्या वाहनांना किमान १५ तर कमाल २३,२५० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो', असंही त्यांनी म्हटलं.


हेही वाचा -

नायर रुग्णालयातील ३ निवासी डाॅक्टरांना मारहाण

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या यंदाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे - मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या