Advertisement

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार- मुख्यमंत्री

खुल्या गटातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा. त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार- मुख्यमंत्री
SHARES

वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा विविध घटकांच्या आरक्षणामुळं कमी झाल्या आहेत. या जागा आता वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय, खुल्या गटातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा. त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिलं आहे

समिती स्थापन

'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळानं रविवारी मुख्यमंत्र्यांची याबाबत भेट घेतली. त्यावेळी खुल्या प्रवर्गाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. तसंच, आर्थिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील मराठा आरक्षणामुळं खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्यानं, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.

प्रवेश प्रक्रिया

महिनाभरात अन्य अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नव्या आरक्षणामुळं मोठ्या प्रमाणावर खुल्या जागा कमी झाल्याचं लक्षात येताच भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारनं याबाबत तातडीनं लक्ष्य घालून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या हितांचं रक्षण करावं, अशी मागणी या शिष्टमंडळानं केली.हेही वाचा -

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम एसटी चालकांच्या पगारातून करणार वसूल

दिव्यांशप्रकरणी महापालिकेविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा