Advertisement

दिव्यांशप्रकरणी महापालिकेविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चा

गोरेगावमधील नाल्यात वाहून गेलेल्या २ वर्षीय बेपत्ता दिव्यांशप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.

दिव्यांशप्रकरणी महापालिकेविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चा
SHARES

गोरेगावमधील नाल्यात वाहून गेलेल्या २ वर्षीय बेपत्ता दिव्यांशप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या पी दक्षिण वॉर्डवर मंगळवारी हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मनसेसह इतर राजकीय पक्षही सहभागी होणार आहेत.

अद्याप तपास सुरूच

सर्वपक्षीय मोर्चा हा सकाळी १०.३० वाजता गोरेगाव पश्चिम एमजी रोडवरील मनसे मध्यवर्ती कार्यालय ते एस.व्ही.रोड ते पी दक्षिण वॉर्ड कार्यालय यादरम्यान काढण्यात येणार आहे. गोरेगावातील आंबेडकर चौकातील नाल्यात १० जुुलैला रात्री दिव्यांश सिंह हा २ वर्षांचा मुलगा  पडला. ४ दिवस उलटून गेले तरी अद्याप त्याचा काही शोध लागला नाही.

महापालिकेचा हलगर्जीपणा

महापालिकेच्या या हलगर्जीपणास पी दक्षिण वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त आणि परिरक्षण विभाग व संबंधित अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप गोरेगाव विधानसभा अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी केला आहे. त्यामुळं पी दक्षिण वॉर्डच्या सहायक पालिका व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी आदी विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. 



हेही वाचा -

महापालिकेकडून गटारात वाहून गेलेल्या दिव्यांशचे पुन्हा शोधकार्य सुरू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा