Advertisement

महापालिकेकडून दिव्यांशचं पुन्हा शोधकार्य सुरू

स्थानिकांनी सुचविलेल्या ४ वेगवेगळ्या ठिकाणी शनिवारी सकाळपासून महापालिकेनं दिव्याशच्या शोधकार्याला पुन्हा सुरूवात केली. त्यानुसार, ४ टीमचे ४० कामगार दिव्यांशचा शोध घेत आहेत.

महापालिकेकडून दिव्यांशचं पुन्हा शोधकार्य सुरू
SHARES

मुंबईतल्या मालाड येथील इटालियन कंपनी शेजारील नाल्याच्या मॅनहोलध्ये  २ वर्षांचा दिव्यांश सिंग हा मुलगा पडला. बुधवारी रात्री ही घटना घडली. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्याचा काहीच शोध लागला नाही. अखेर शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास म्हणजे तब्बल ४८ तासांनी हे शोधकार्य थांबविण्यात आलं होतं. परंतु, आता पुन्हा दिव्यांशच्या शोधकार्याला सुरूवात करण्यात आली आहे.

४ टीमचे ४० कामगार

स्थानिकांनी सुचविलेल्या ४ वेगवेगळ्या ठिकाणी शनिवारी सकाळपासून महापालिकेनं दिव्याशच्या शोधकार्याला पुन्हा सुरूवात केली. त्यानुसार, ४ टीमचे ४० कामगार दिव्यांशचा शोध घेत आहेत. बुधवारी घडलेल्या या  दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफनं दिव्यांशचा शोध घेतला. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्याचा काहीच शोध लागला नाही. 

शोध घेण्याची मागणी

स्थानिकांनी संताप व्यक्त करत, महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढत दिव्यांशचा शोध घेण्याची मागणी केली. त्यानंतर, महापालिकेनं शनिवारी सकाळपासून दिव्यांशचे शोधकार्य पुन्हा हाती घेतले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रॉमेल, अ‍ॅनमॉल टॉवर, पिरामलनगर आणि परवशी येथे गाळ अधिक असून, त्या ठिकाणी दिव्यांशचा पुन्हा शोध घेतला जात आहे.



हेही वाचा -

रेल्वे स्थानकांवर दिसणार अधिकृत फेरीवाले



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा