Advertisement

वाहतूक नियम मोडल्यास एसटी चालकांचा कापणार पगार!

एसटी चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी, संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

वाहतूक नियम मोडल्यास एसटी चालकांचा कापणार पगार!
SHARES

अनेकदा एसटीच्या चालकांकडून चुकीच्या पद्धतीनं आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवले जाते. त्यामुळं आता एसटी चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी, संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून ई-चलानद्वारे दंड आकारणी करण्यात आली आहे. दंड न भरल्यास आरटीओमध्ये एसटीचे पासिंग होणार नाही. त्यामुळं आता या प्रकरणी विभाग नियंत्रणाकडून चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दंडाची रक्कम वसूल

परळ आणि उरण आगार व्यवस्थापकाला संबंधित चालकांवर दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी परळ आगारातील ११ आणि उरण आगारातील ५ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आगार व्यवस्थापकाला पत्रक

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीसांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येते. त्याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं गाडीचा क्रमांक, वेळ नमूद केली जात असून, ठिकठिकाणी असलेले वाहतूक पोलीस अशा वाहनांचे फोटो काढून तक्रार दाखल करतात. त्यानंतर ही तक्रार परिवहन मंडळाला देण्यात येते. त्याचप्रमाणं, विभाग नियंत्रणाकडून आगाराचे नाव, एसटी गाडीचा क्रमांक, दिनांक, वेळ, चलान क्रमांक आणि दंडाची रक्कम यांचे पत्रक आगार व्यवस्थापकाला देण्यात येतं.

कर्मचारी संघटनांचा विरोध

या प्रकरणी कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. कोणताही चालक उगाच वाहतुकीचे नियम मोडत नाही. त्यामुळं दंडाची रक्कम चालकांकडून वसूल करणं अयोग्य आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. त्यातच आता दंडाची वसुली त्यांच्या पगारातून करणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं आहे, अशा शब्दांत कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.हेही वाचा -

लहानग्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी जे.जे. रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग

महापालिकेकडून गटारात वाहून गेलेल्या दिव्यांशचे पुन्हा शोधकार्य सुरूRead this story in हिंदी
संबंधित विषय