Advertisement

लहानग्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी जे.जे. रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग

देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये लहान मुलांचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावे, यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लहानग्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी जे.जे. रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग
SHARES

देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये लहान मुलांचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावे, यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एका संस्थेच्या साहाय्यानं जे.जे. रुग्णालयात हे विभाग सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळं जे. जे. रुग्णालयाचा हा निर्णय लहान मुलांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

सामंजस्य करार

कॅनकिड्स या नॅशनल सोसायटी आॅफ चेंज चाइल्डहूड कॅन्सर संस्थेशी जे.जे. रुग्णालयानं सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार लहानग्यांमध्ये दिसून येणाऱ्या कर्करोगाविषयी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहे. त्यामुळं लवकरच शासकीय रुग्णालयात अल्प दरात लहानग्या कर्करोग रुग्णांना उपचार मिळणं सोपं होणार आहे.

कर्करोगाचं निदान

अनेकदा लहानग्या रुग्णांमध्ये कर्करोगाचं निदान उशिरानं होतं. त्यामुळं उपचारासही विलंब होतो, हे टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात उपचार उपलब्ध होणे गरजेचे आहे. देशात दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार मुलं कर्करोगानं ग्रस्त होतात. यामधील बहुतांश रुग्ण योग्य मार्गदर्शनाच्या अभावानं उपचारांना मुकतात. याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे.हेही वाचा -

छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करण्याला कोळी बांधवांचा विरोध

दिव्यांशप्रकरणी महापालिकेविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय