Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करण्याला कोळी बांधवांचा विरोध

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र, ही मंडई स्थलांतरित होऊ नये, यासाठी कोळी बांधव आंदोलन करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करण्याला कोळी बांधवांचा विरोध
SHARES

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र, ही मंडई स्थलांतरित होऊ नये, यासाठी कोळी बांधव आंदोलन करणार आहेत.

आंदोलनाचा इशारा

महापालिकेनं मंडईतील गाळेधारकांना ३१ जुलैपर्यंतची गाळे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. परंतु, या मंडईवर ६०० महिला गाळेधारक आणि ४०० होलसेल विक्रेत्यांचा उदरनिर्वाह अबलंबून असल्यामुळं नोटीस कालावधी संपेपर्यंत संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णल घ्यावा, अन्यथा १ आॅगस्टपासून सर्व बाधित कोळी बांधव व महिला आंदोलन करतील, अशा इशारा देण्यात आला आहे.

मंडई बंद करण्याची नोटीस

महापालिकेच्या बाजार समितीतर्फे १ जुलैला छत्रपती शिवाजी महाराज मंडई बंद करण्याची नोटीस देण्यात आली. मात्र, या नोटिसचा सर्व किरकोळ मासळी विक्रेत्या महिलांनी निषेध करत, मंडई सोडून कोणत्याही अन्य ठिकाणी जाण्यास विरोध दर्शविला आहे. नोटीसमधील विषयात ‘तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणेबाबत’ असं नमूद करून मूळ नोटीसमध्ये ‘कायमस्वरूपी जागा मिळण्यास स्थलांतरित’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. याबाबत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली असून, या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.हेही वाचा -

महापालिकेकडून गटारात वाहून गेलेल्या दिव्यांशचे पुन्हा शोधकार्य सुरू

दिव्यांशप्रकरणी महापालिकेविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चासंबंधित विषय
Advertisement