Advertisement

नायर रुग्णालयातील ३ निवासी डाॅक्टरांना मारहाण

मुंबईतील नायर रुग्णालयातल्या ३ निवासी डॉक्टरांना रविवारी रात्री १० ते १२ जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नायर रुग्णालयातील ३ निवासी डाॅक्टरांना मारहाण
SHARES

मुंबईतील नायर रुग्णालयातल्या ३ निवासी डॉक्टरांना रविवारी रात्री १० ते १२ जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

नायर रुग्णालयात राजकिशोर दिक्षित (५०) या रुग्णाला रविवारी सकाळी ७ वाजता दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला क्षयरोगासहीत इतर संसर्गजन्य रोगाची लागण झाली होती. ज्यावेळेस या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यावेळेस त्याची प्रकृती गंभीर होती. त्याचे प्राण वाचवण्यासाठी डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सायंकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला.

 सुरक्षा रक्षकालाही मारहाण

ही बाब जेव्हा डाॅक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यास गेले तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी डाॅक्टरांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. एवढंच नाही, तर उपस्थित जमावाने रुग्णालयातील वस्तूंची तोडतोड केली. या ३ डाॅक्टरांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या सुरक्षा रक्षकांनाही जमावाने मारहाण केली. अखेर इतर सहकारी डाॅक्टरांनी या ३ डाॅक्टरांना कसंबसं जमावाच्या तावडीतून सोडवलं. डाॅ. गौरव गुंजन, डाॅ. दीपाली पाटील आणि डाॅ. मोईज व्होरा अशी या डाॅक्टरांची नावं आहेत. या ३ डाॅक्टरांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

आग्रीपाडा पोलिसांनी जमावाविरोधात भादंवि ३५३, ३३२, ५०४, ३४ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा निवासी डाॅक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहीला आहे.  हेही वाचा-

दिव्यांशचं शोधकार्य पुन्हा सुरू

छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करण्याला कोळी बांधवांचा विरोधसंबंधित विषय
Advertisement