मुंबईतील फेरीवाल्यांना लवकरत 'फेरीवाला क्षेत्र' असलेली जागा दिली जाणार आहे. त्यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली आहे. अस असताना महापालिकेनं आता फेरीवाल्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या अनुज्ञापन विभागानं तसा प्रस्ताव तयार केला असून, विधि समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
महापालिकेकडून फिरत्या फेरीवाल्यांकडून २५ ते ५० रुपये आणि जागेवर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून १०५ ते २७० रुपये मासिक शुल्क आकारले जाणार आहेत. या शुल्कवाढीवरून येत्या विधि समितीमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात शुल्कवाढ करण्याचं सूतोवाच महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनानं सुरू केली आहे.
प्रशासनानं अनुज्ञापन दरसूची तयार केली आहे. त्यानुसार, पदपथविक्री शुल्क वसूल करण्यात येणार आहे. शुल्कवाढीचा प्रस्ताव विधि समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून ते शुल्क लागू होणार आहे.
मुंबईत सध्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सध्या सुधारित यादीतील फेरीवाला क्षेत्रातील काही रस्त्यांवरील पदपथांवर १ चौरस मीटर जागेचं पट्टेही आखले जात आहे. दरम्यान, सुधारित फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र बनवताना स्थानिक नगरसेवकांना नगर पथविक्रेता समितीमध्ये घेण्याची मागणी होत आहे.
परंतु, अशी कोणतीही तरतूद नसल्यानं तत्कालीन उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी २४ विभाग कार्यालयातील पथविक्री क्षेत्रं बनवताना सर्व संबंधित नगरसेवकांसोबत बैठका घेऊन पथविक्री क्षेत्र तयार करण्यात यावीत आणि त्यांच्या हरकती व सूचना लक्षात घेण्यात याव्यात, असे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट लेखी उत्तरात केलं आहे.
‘अ’ वर्ग
संपूर्ण दक्षिण मुंबईचा भाग, लालबाग, परळ, प्रभादेवी, दादर माहीम, वांद्रे पश्चिम गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरिवली, घाटकोपर, मुलुंड
‘ब’वर्ग
वांद्रे पूर्व, दहिसर, कुर्ला, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, भांडुप
फेरीवाले सध्याचे कमाल दर स्तावित दर (रुपयांमध्ये)
अ श्रेणी ब श्रेणी
फिरते फेरीवाले २५ ५० २५
स्थिर हातगाडी १३५ २७० १६०
फिरती हातगाडी ७० १४० ८०
बैठे फेरीवाले ७० १४० ८०
उसाचे चरक ७५० १५०० ९००
हेही वाचा -
मुंबई भाजपला मिळणार नवा अध्यक्ष? 'या' नेत्यांची नावे चर्चेत
कास्टिंग डायरेक्टरचा पराक्रम, विवाहितेला पाठवायचा अश्लील व्हिडिओ