कास्टिंग डायरेक्टरचा पराक्रम, विवाहितेला पाठवायचा अश्लील व्हिडिओ

त्याने विवाहितेला तिचे काढलेले फोटो सर्वत्र वायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. विवाहितेच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवू लागला.

कास्टिंग डायरेक्टरचा पराक्रम, विवाहितेला पाठवायचा अश्लील व्हिडिओ
SHARES

मुंबईतील एका ३० वर्षीय विवाहितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिच्याजवळ शरिरसुखाची मागणी करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कयूर शहा (३०) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचाः- Exclusive अंधेरीत कपड्यांच्या दुकानातील चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, टेलरला अटकओशिवरा परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेची तिच्या मैत्रिणीने कयूर याच्याशी २०१९ मध्ये ओळख करून दिली होती. कयूरने विवाहितेला चित्रपटात काम देण्यात आश्वासन दिले होते. त्यानंतर विवाहित महिला आणि कयूर हे एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान एकेदिवशी विवाहितेला कयूरचा फोन आला. त्याने तिला घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने घरी तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत, त्याने कास्टिंगसाठी विवाहितेचे फोटो काढून घेतले. तर काही दिवसानंतर त्याने घरासाठी विवाहितेकडे १ लाख रुपये मागितले. त्यानुसार तिने ते पैसे दिले. त्यानंतर पून्हा स्वतःच्या अपहरणाचे कारण पूढे करून कयूरने विवाहितेकडून २ लाख उकळले. 

हेही वाचाः- अभिनेता टायगर श्रॉफ सारखं स्टंट करणं पडलं महागात

काही दिवसानंतर विवाहितेने कयूरकडे तिने दिलेल्या पैशांची मागणी केली असता. कयूर उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच त्याने विवाहितेला तिचे काढलेले फोटो सर्वत्र वायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. विवाहितेच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवू लागला. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने ओशिवरा पोलिसात ५०९,५०७ भा.द.वी. कलमांतर्गत गुन्हा नोंदवून कयूरला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपासकरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली. 

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा