Videoचालत्या लोकलमध्ये केला टायगर श्रॉफसारखा स्टंट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टायगर श्राॅफप्रमाणे तो स्वत:चा जीव धोक्यात टाकून अनेक स्टंट करायचा

SHARES

मुंबईत रेल्वेतून प्रवास करताना अभिनेता टायगर श्राॅफ सारखं धावत्या लोकलमध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. स्टंटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वडाळा जीआरपी पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे. राहुल चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे.

घाटकोपर मध्ये राहणारा राहुल चव्हाण हा अभिनेता टायगर श्राॅफचा चाहता आहे. टायगर श्राॅफ प्रमाणे तो स्वत:चा जिव धोक्यात टाकून अनेक स्टंट करायचा. नुकताच टायगर श्रॉफचा 'बागी ३' चिञपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. त्यात श्रॉफ एका धावत्या वाहनात स्टंट करताना दाखवला आहे. तो स्टंट  राहुलच्या डोक्यात फिट बसला होता. तो स्टंट करण्यासाठी त्याने अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात ही टाकला होता. शनिवारी सकाळी ११ वा.राहुल विना तिकिट हार्बर लोकलने गोरेगावला जाणाऱ्या लोकलच्या शेवटच्या डब्यातून प्रवास करत होता.

त्यावेळी राहुल प्रवास करत असलेली लोकल  वडाळा स्थानकावरून निघाली असता. धावत्या लोकलमधून प्रवास करणारा राहुल दरवाजात उभा राहुन स्टंट करत होता. ही बाब सीसीटिव्हीवर नजर ठेवून असलेल्या वडाळा  रेल्वे पोलिसांनी पाहिली. त्यांनी तातडीने पुढे किंग्ज सर्कल स्थानकावर गस्तीवर असलेल्या पोलिस शिपाई रवींद्र सोनावणे यांना कळवली. सोनावणेंनी लोकल स्थानकावर थांबताच राहुलला ताब्यात घेतलं. राहुलवर वडाळा रेल्वे पोलिसांनी ३३६ भाा.द.वी आणि रेल्वे अॅक्ट १४ नुसार गुुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपण टायगर श्रॉफचा फॅन असून त्याच्यासारखे स्टंट फार पूर्वीपासून करत असल्याचं सांगितलं. या आधीही राहुलला पोलिसांनी असे जीवघेणे स्टंट करताना अटक केली असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा