Exclusive अंधेरीत कपड्यांच्या दुकानातील चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, टेलरला अटक

कपडे बदलून झाल्यानंतर तिची नजर चेंजिग रुममध्ये खिळ्याला अडकवलेल्या पिशवकडे गेली. ती पिशवी विवाहितेने पाहिली असता. तिला पिशवीत मोबाईल लपवलेला दिसला.

Exclusive अंधेरीत कपड्यांच्या दुकानातील चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, टेलरला अटक
SHARES
मुंबईच्या अंधेरी येथील लोखंडवाला या उच्चभ्रूपरिसरातील लेडी टेलरच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये( ट्रायल रुम) महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी टेलरला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षल दयानंद बांगर यांनी दिली.

अंधेरी लोखंडवाला परिसरात आरोपी  शेहनवाज सज्जाद हुसेन यांचे कामधेनू शाँपिंग सेंटरमध्ये सिमरन लेडिज टेलरिंग नावाचे दुकान आहे. या दुकानातील चेंजिंग रुममध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार महिलेला तिच्या एका मैञिणीने या टेलरची माहिती दिली होती. यापूर्वी ही विवाहितेने या टेलरकडून ड्रेस शिवून घेतला असल्याने 2 फेब्रुवारी रोजी विवाहितेने  पुन्हा कपडे शिवायला दिले होते. हे कपडे 9 फेब्रुवारी रोजी मिळणार होते. त्यानुसार विवाहित महिला रविवारी दुपारी 3 वा. कपडे घेण्यासाठी शेहनवाजच्या दुकानात आली. त्यावेळी शेहनवाजने विवाहितेला दुकानाच्या पोट माळ्यावर असलेल्या चेंजिग रुममध्ये ड्रेस घालून पाहण्यास सांगितले. 

त्यानुसार विवाहिता कपडे बदलण्यास चेंजिंग रुममध्ये गेली. कपडे बदलून झाल्यानंतर तिची नजर चेंजिग रुममध्ये खिळ्याला अडकवलेल्या पिशवकडे गेली. ती पिशवी विवाहितेने पाहिली असता. तिला पिशवीत मोबाईल लपवलेला दिसला.त्या विवाहितेने तो मोबाईल काढून पहिला. तेव्हा तिला मोठा धक्का बसला. कारण त्यात तिचेच कपडे बदलतानाचे चित्रिकरण दिसून आले. त्यानंतर तिने हिंमत करुन दुकानदाराला जाब विचारला. मात्र, शेहनवाजने थातूर मातूर उत्तर देऊ लागला. या घटनेची माहिती पीडितेने तिची मैञिण आणि घरातल्यांना दिल्यानंतर विवाहितेच्या कुटुंबियांनी त्या टेलरच्या दुकानाच्या दिशेने धाव घेतली.

नातेवाईक येताच विवाहितेने काँलरला पकडून शेहनवाजला ओशिवरा पोलिस ठाण्यात आणले. विवाहितेने शेहनवाजच्या कृत्याची माहिती पोलिसांना देत तक्रार नोंदवली. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी चेंजिग रुममध्ये लपवण्यात आलेला मोबाइल तपासला असता. त्यात विवाहितेचे कपड्ये बदलतानाचे दृष्य होते. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी शेहनवाज विरोधात 354(क) भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या आधी ही शेहनवाजने अशी कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुशंगाने पोलिस त्याच्याजवळ तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले.


असा शोधा छुपा कँमेरा

1.चेंजिंग रूमबाहेर तुमच्या मोबाईलचे नेटवर्क चांगले असेल आणि रूममध्ये गेल्यावर त्यात अडथळे येत असतील तर ऑप्टिकल फायबर्समुळे असा अडथळा येतो. याचाच अर्थ रूममध्ये कॅ मेरा आहे.

2.आरशात कॅमेरा असू शकतो. यासाठी आरशावर हलक्या हाताने मारल्यानंतर आतून पोकळ आवाज येत असेल तर आरशाच्या मागे नक्कीच काहीतरी आहे हे लक्षात घ्यावे.

3. आरशाला स्पर्श के ल्यानंतर बोट आणि त्याची आरशात दिसणारी प्रतिमा यात फट दिसली तर आरशात कुठल्याही प्रकारचा कॅमेरा नाही. मात्र, जर बोट आणि आरशात दिसणारी बोटाची प्रतिमा एकमेकात मिसळल्यासारखी दिसत असतील तर आरशात सिल्वर लाईनिंग नसून दुसरे काहीतरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

4. चेंजिंग रूममधील दिवे बंद करून कपडे बदलणे हा एक उपाय आहे.

5. चेंजिंग रूममध्ये दिवे बंद केल्यानंतर लाल किंवा हिरव्या रंगांचा पुसटसे किरण दिसत असतील तर तो कॅमेऱ्याचा लाईट असू शकतो. 

6. चेंजिंग रूममध्ये दिवे बंद करून कॅ मेऱ्याचा फ्लॅश सुरू केल्यानंतर आरशाच्या मागे किंवा अन्यत्र छुपा कॅ मेरा असेल तर तो पकडता येतो. 

7. दुकानांमध्ये बाहेरच्या ठिकाणी लावलेल्या कॅ मेऱ्यांबाबतही सावधानता बाळगली पाहिजे. 

8. आपल्या परिसरातील पोलिस स्थानक, नियंत्रण कक्षाचे क्रमांक स्वत:कडे बाळगले तर तुम्ही अशावेळी पोलिसांची मदत घेऊ शकता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा