३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत (Mumbai) वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी महापालिकेनं आणखी एक मिशन हाती घेतलं आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेनं (BMC) आता 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग' हे मिशन राबवणार आहे.

या मिशन अंतर्गत अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार आहे. अँटीजेन टेस्टिंगच्या (Antigen Tests) एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. तसंच शासनानं नुकत्याच दिलेल्या मान्यतेनुसार, रॅपिड टेस्टींग कीट खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास कॉर्पोरेट हाऊसेस, खासगी कंपन्या यांनाही सुचवण्यात आलं आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)नं मान्यता दिलेल्या एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या कीटद्वारे अँन्टीजेन टेस्टींग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या आरटीपीसीआर या एकमेव निदान चाचणीच्या तुलनेत ही चाचणी अतिशय वेगवान आहे. या चाचणीचा परिणाम हा १५ ते ३० मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्यानं बाधित रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं शासन मान्य ॲन्टीजेन कीटच्या 1 लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कीट उपलब्ध होणार आहेत. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, शासन रुग्णालये तसंच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात येतील.


हेही वाचा

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पालिकेचे ‘मिशन झिरो’, 'असा' आहे नवा अ‍ॅक्शन प्लॅन

पुढील बातमी
इतर बातम्या