मुंबई महापालिका वाढवणार फेरीवाला शुल्क

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महसूल वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) फेरीवाला शुल्कात (hawkers charge) वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिका नवीन फेरीवाला धोरणावर काम करत आहे. यानुसार, शहरातील परवानाधारक फेरीवाल्यांना जागा वाटप करण्यात येणार आहे. तसंच जागा वाटप झाल्यावर फेरीवाल्यांना नवीन शुल्क आकारले जाईल. प्रस्तावित दरानुसार, फिरणाऱ्या फेरीवाल्यांकडून एका महिन्याला ५० रुपये शुल्क आकारलं जाईल. तर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून महिन्याला ७० रुपयांऐवजी १४० रुपये आकारले जातील. याशिवाय पदपथांवरील फेरीवाल्यांना २०  रुपये तर  परवाना स्टॉल असणाऱ्यांना दर महिन्याला १५०० रुपये द्यावे लागतील.

मुंबई पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) परवाना विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, फेरीवाला शुल्क (hawkers charge) वाढवल्यामुळे पालिकेला वर्षाला १० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर बंदी घालणार असून नवीन धोरणांतर्गत महापालिका १५ हजारहून अधिक फेरीवाल्यांना (hawkers) जागांचं वाटप करणार आहे.

परवानाधारक फेरीवाल्यांची सत्यता तपासण्यासाठी महापालिका सर्वेक्षणही करणार आहे. यानंतर बेकायदा फेरीवालांना हटवून कायदेशीर कारवाई केली जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या नवीन फेरीवाला धोरणानुसार,  फेरीवाल्यांसाठी काही जागा निश्चित केल्या आहेत. या जागांंमध्ये मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगडच्या आसपासचा परिसराचाही समावेश आहे.  सुमारे १०० फेरीवाले राजगडच्या समोरील रस्त्यावर आपला धंदा मांडणार आहेत. 


हेही वाचा -

महिला अत्याचाराच्या तक्रारीवर २४ तासात कारवाई, राज्य सरकारचे पोलिसांना आदेश

कोरोनामुळं कोस्टल रोडचं काम रखडणार?


पुढील बातमी
इतर बातम्या