Advertisement

कोरोनामुळं कोस्टल रोडचं काम रखडणार?

कोरोना विषाणूचा फटका आता मुंबई (mumbai) च्या कोस्टल रोड (Coastal road) प्रकल्पालाही ( सागरी किनारा महामार्ग प्रकल्प) बसण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळं कोस्टल रोडचं काम रखडणार?
SHARES

चीन (china) मध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूने (Corona virus) आतापर्यंत हजारोंचे बळी घेतले आहेत. जगभरात हा विषाणू पसरण्याची भिती असल्याने मोठी खबरदारी घेतली जात आहे. चीनमधून होणारी आयातही थांबवण्यात आली आहे.  कोरोना विषाणूचा फटका आता मुंबई (mumbai) च्या कोस्टल रोड (Coastal road) प्रकल्पालाही ( सागरी किनारा महामार्ग प्रकल्प) बसण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडच्या कामात बोगदा खणण्यासाठी  चीनमधून टनेल बोअरिंग मशीन (Tunnel Boring Machine) आणण्यात येणार आहे.  मात्र, आता ही मशीन लवकर येण्याची चिन्हं नाहीत. चीनमधून होणारी आयात थांबवलेली असल्यामुळे टनेल बोअरिंग मशीन आणणं लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

न्यायालयीन प्रकरणांमुळे कोस्टल रोडचं (Coastal road) काम ५ महिने ठप्प होतं. कोस्टल रोडच्या कामावर घातलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०१९ मध्ये उठवली आहे. त्यामुळे कोस्टल रोडचं काम वेगात सुरू असून भरावाचे काम आणि खोदकामाने वेग घेतला आहे. मात्र, आता कोरोना विषाणूचा या कामात अडथळा निर्माण झाला आहे. कोस्टल रोड कामात ३.४५ मीटरचे दोन बोगदे खणण्यात येणार आहेत. ऑगस्टपासून बोगदे खणण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे बोगदे खणण्यासाठी चीनहून टीबीएम मशीन (TBM machine) आणण्यात येणार आहे. एप्रिलपर्यंत हे मशीन मुंबईत समुद्रमार्गे आणण्यात येणार आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पूर्ववत होत नाही ताेपर्यंत मशीन इथे आणता येणार नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील कोस्टल रोडवर (Coastal road) ३.४५ मीटरचे दोन बोगदे (Tunnel) समुद्राच्या खालून असणार आहेत. या बोगद्यामध्ये वाहनांसाठी तीन लेन असतील. हे बोगदे मेट्रो रेल्वेसाठी खणलेल्या बोगद्यांपेक्षा मोठे आणि मेट्रो रेल्वेपेक्षा या बोगद्यांचा व्यास मोठा आहे. मेट्रोच्या बोगद्याचा व्यास हा पाच ते सहा मीटरचा आहे तर सागरी मार्गाच्या बोगद्याचा व्यास ११ ते १२ मीटरचा आहे त्यामुळे तेवढा मोठा व्यास असलेले टीबीएम मशीन आणण्यात येणार आहे. 

  • कोस्टल रोडच्या कामात बोगदा खणण्यासाठी  चीनमधून टनेल बोअरिंग मशीन (Tunnel Boring Machine) आणण्यात येणार आहे. 
  • चीनमधून होणारी आयात थांबवलेली असल्यामुळे टनेल बोअरिंग मशीन आणणं लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
  • प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील कोस्टल रोडवर (Coastal road) ३.४५ मीटरचे दोन बोगदे (Tunnel) समुद्राच्या खालून असणार आहेत. 

हेही वाचा -

मेट्रो-३ मार्गिकेचं ७६ टक्के भुयारीकरण पूर्ण

Video: माझगावच्या GST भवन इमारतीला भीषण आग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा