Advertisement

Video: माझगावच्या GST भवन इमारतीला भीषण आग

मुंबईतील माझगाव परिसरातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवनमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर आग लागल्याचं समजत आहे.

Video: माझगावच्या GST भवन इमारतीला भीषण आग
SHARES

मुंबईतील माझगाव परिसरातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवनमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर आग लागल्याचं समजत असून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग लागल्याचं समजताच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक अर्धवट सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत.


 

जीएसटी भवनच्या नव्या इमारतीला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केलं आहे. लेव्हल ४ ची म्हणजेच गंभीर स्वरूपाची आग लागली आहे. महाराणा प्रताप चौक, भायखळा परिसरात असलेल्या या इमारतीत जीएसटी कार्यालयासोबत इतर आस्थापनांचीही कार्यालये आहेत. सोबतच इमारतीच्या आजूबाजूला इतर आॅफिस आणि निवासी इमारती आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आठव्या आणि नवव्या मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून इतर कर्मचाऱ्यांनाही सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आलं आहे. 

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आलेल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा