लोकलची गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के उपस्थितीचा बीएमसीचा आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता पालिकेने कठोर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे.  लोकल ट्रेनमधील गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे आदेश दिले आहेत. 

या नियमाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पालिकेने पाच पथकंही तैनात केली आहेत. ही पथके खासगी कार्यालयांवर नजर ठेवणार आहेत. ५० टक्के उपस्थितीचा नियम मोडणाऱ्या कार्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.  

मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. मुंबईत गुरूवारी ५ हजार ५०४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी घटून ७५दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे ३३ हजार ९६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मुंबईत लोकल रेल्वे काही नियमांसह सुरु करण्यात आली आहे.  सामान्य नागरिकांची लोकलमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. ही गर्दीही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचं कारण ठरू शकते. त्यामुळे लोकलची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.  कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळी वस्तीत ४० कंटन्मेंट झोन्स जाहीर करण्यात आले आहेत. तर ४५७ इमारती सील केल्या आहेत. 


हेही वाचा - 

सनराईस रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

पुढील बातमी
इतर बातम्या