मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क न केल्यास कठोर कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील महिन्यात दिल्लीमध्ये निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीने मरकज या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं . मरकजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असं आवाहन पालिकेने केलं आहे. माहिती न देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

मरकजला राज्यातून अनेक जण गेले होते. त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठी वाढली आहे. फक्त मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या जवळ गेला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका कोरोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करत आहे. मरकज येथे गेलेल्या नागरिकांमुळे इतरांना कोरोना होऊ नये म्हणून पालिकेने ट्विट करत आफली माहिती देण्याचं आवाहन केले आहे. जर प्रवासाची माहिती दिली नाही तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही पालिकेनं सांगितलं आहे.

या कार्यक्रमाला भारतांसह जवळजवळ १६ देशातील २३०० लोकांनी उपस्थिती लावली होती. कोरोना व्हायरसमुळे दिल्ली सरकारने धार्मिक आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमावर बंदी घातली होती. मात्र दिल्लीत तबलिगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच तबलिगी जमातीचे प्रमुख मौलानांसह अन्य जणांच्या विरोधात साथीच्या रोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हेही वाचा

'साराभाई Vs साराभाई' आणि 'खिचडी' तुम्हाला पुन्हा हसवणार

Coronavirus : अखेर कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटिव्ह


पुढील बातमी
इतर बातम्या