रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेचं मोबाईल अॅप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे करूनही मुसळधार पावसामुळे नवीन खड्डे तयार होतच असतात. या खड्ड्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. त्यामुळं पावसाळ्यात अशा घटना घडू नये यासाठी महापालिकेनं खड्डे बुजवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. महापालिकेनं एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केले आहेत. या नंबरवर खड्ड्याचा फोटो टाकल्यास २४ तासांत ते बुजवण्यात येणार आहेत.

२४ व्हॉट्सअॅप नंबर

मुंबई महापालिकेनं २४ वार्डांसाठी २४ व्हॉट्सअॅप नंबर जारी केले आहेत. आपापल्या विभागात दिसणारे खड्डे या व्हॉट्सअॅपवर टाकल्यास तात्काळ ते बुजवण्यात येणार आहेत. पावसाळ्यात खड्ड्यातून मार्ग काढणाऱ्या प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.

खड्ड्यांची तक्रार

मुंबई महापालिकेनं सर्व २४ वॉर्डांमधील रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्सअॅप नंबर दिले आहेत. खड्ड्यांची तक्रार देण्यासाठी पालिकेनं ‘MCGM 24×7’ हे अॅप सुरू केले असून, ते तुम्हाल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. तसंच खड्ड्यांची तक्रार टोल फ्री क्रमांक १८००२२१२९३ या क्रमांकावर देखील करता येणार आहे.

व्हॉट्सअॅप क्रमांक 

  • ए – 8879657698
  • बी – 8879657724
  • सी – 8879657704
  • डी -8879657694
  • ई – 8879657712
  • एफ-उत्तर – 8879657717
  • एफ-दक्षिण – 8879657678
  • जी-उत्तर – 8879657683
  • जी-दक्षिण – 8879657693
  • के-पूर्व -8879657651
  • के-पश्चिम – 8879657649
  • पी-दक्षिण – 8879657661
  • पी-उत्तर- 8879657654
  • आर-दक्षिण - 8879657656
  • आर-उत्तर - 8879657636
  • आर-मध्य – 8879657634
  • एल – 8879657622, 8879657610
  • एम-पूर्व – 8879657622, 8879657615
  • एम-पश्चिम – 8879657608
  • एन – 8879657617
  • एस – 8879657603
  • टी – 8879657609


हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बेस्टची किंग्ज सर्कल परिसरात मोफत सेवा

नायर रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला


पुढील बातमी
इतर बातम्या