नायर रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला

वाँर्ड क्रमांक ७ मधून एक पाच दिवसांचे बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बाळ चोरणाऱ्या महिलेने महिलांच्या खांद्याला अडकवणाऱ्या बँगेतून हे बाळ चोरल्याचा सीसीटिव्ही सोशल मिडियावर वायरल

नायर रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला
SHARES


डाँ पायल तडवीच्या आत्महत्येनंतर पून्हा एकदा नायर रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुढे आला आहे. नायर रुग्णालयाच्या वाँर्ड क्रमांक ७ मधून एक पाच दिवसांचे बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बाळ चोरणाऱ्या महिलेने खांद्याला अडकवणाऱ्या बँगेतून हे बाळ चोरल्याचा सीसीटिव्ही सोशल मिडियावर वायरल होत आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अनोळखी महिले विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस तिचा माग काढत आहे.


बॅगेतून बाळ चोरले

दहिसर पूर्व परिसरात राहणारी बाळाची आई शितल साळवी हिला शनिवारी नायर रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ७ मध्ये  दाखल केले होते. रविवारी शीतल यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. गुरूवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास शीतल या झोपेतून जाग्या झाल्या असता. त्यांना त्याचे बाळ शेजारी आढळून आणले नाही. सर्वत्र शोधाशोध सुरू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील सीसीटिव्ही तपासले. त्यावेळी एक निळ्या रंगाचे कपडे घातलेली महिला बाळ बॅगेतून लपवून नेताना आढळून आली. सीसीटिव्हीत तिचा चेहरा स्पष्ट दिसून आलेला नाही. रुग्णालयाच्या बाहेर पडताच तिने ते बाळ बॅगेतून काढून खांद्यावर झोपवत रुग्णालयाबाहेरील टॅक्सी पकडली.


वाकोल्यातून महिला ताब्यात 

पोलिसांनी शहरातील सीसीटिव्हीच्या मदतीने मूळ पळवणाऱ्या टॅक्सीचा नंबर नोट केला आहे. तसेच सीसीटिव्हीच्या मदतीने टॅक्सी माग काढत असताना. टॅक्सीचे शेवटचे लोकशेन हे वांद्रे या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी वाकोला पोलिसांना सतर्क केले. पुढे ही महिला व्हि.एन.देसाई रुग्णालयात बाळ घेऊन दाखल झाली. रस्त्यावर प्रसुती झाल्याचे कारण देत ती रुग्णालयात दाखल झाली. मात्र तिचा बनाव फार काळ टिकला नाही. मागोमाग वाकोला पोलिस ही रुग्णालयात दाखल झाल्याचे पाहून तिच्या पायाखालची जमिन सरकली. तपासात महिलेने स्वतःचे नाव हेजल डोनाल्ड कोरिया (३७) सांगितले. मूल होत नसल्याने तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी एका ४० वर्षीय अनोळखी महिले विरोधात मुलाच्या अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


नायर रुग्णालयाचा ढिसाळ कारभार

नायर रुग्णालयात या सारखे अपघात घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी नायर रुग्णालयाच्या एमसीआरमध्ये सिलेंडरचा स्फोट घडून जानेवारी २०१८ मध्ये  एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर जानेवारी २०१९ मध्ये ९ डाँक्टरांना विषबाधा झाली होती. त्यानंतर डाँ पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरण संपत नाही. तोच बाळ चोरीची घटना घडल्याने नायर रुग्णालयाची सुरक्षा राम भरोसे आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

हेही वाचा

तनुश्री दत्ताच्या विनयभंगप्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा, पुरावा नसल्याचा पोलिसांचा अहवाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा