तनुश्री दत्ताच्या विनयभंगप्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा, पुरावा नसल्याचा पोलिसांचा अहवाल

हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी विनयभंग केला, असा जाहीर आरोप तनुश्रीनं मागील वर्षी केला होता. त्यावेळी तिनं दिलेल्या लेखी तक्रारीनुसार पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती एफआयआर नोंदवला होता.

तनुश्री दत्ताच्या विनयभंगप्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा, पुरावा नसल्याचा पोलिसांचा अहवाल
SHARES

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना तनुश्री दत्ताच्या विनयभंगप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. नाना पाटेकर यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असलेला बी समरी अहवाल ओशिवरा पोलिसांनी कोर्टात दाखल केला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकरांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर देशभरात 'MeToo' ही चळवळ सुरू झाली होती. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यासह, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्दिकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या कलाकारांवर भारतीय दंडविधान कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.


लेखी तक्रार

हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी विनयभंग केला, असा जाहीर आरोप तनुश्रीनं मागील वर्षी केला होता. त्यावेळी तिनं दिलेल्या लेखी तक्रारीनुसार पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती एफआयआर नोंदवला होता. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणी झालेल्या तपासात नानाविरुद्ध साक्ष देण्यासाठी कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे आला नव्हता. 


क्लीन चिट

या पार्श्वभूमीवर तनुश्रीनं प्रसिद्धीपत्रक काढून आणि तिचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना यांना पोलिसांनी 'क्लीन चिट' दिल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचा दावा केला होता. तसंच नाना यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


हेही वाचा -

ईशा लावणार अपहरण केसचा छडा

डीएनए चाचणीसाठी गॅँगस्टर मुन्ना झिंगाडाचा नकारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा