डीएनए चाचणीसाठी गॅँगस्टर मुन्ना झिंगाडाचा नकार

छोटा राजनवर हाॅटेलमध्ये हल्ला करणाऱ्या मुन्नालाही आपल्या छत्राखाली आणण्यासाठी 'आयएसआय'ने ही चाल खेळल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 'आयएसआय'ने एका अज्ञात व्यक्तीमार्फत पाकिस्तानी पासपोर्ट मुन्नापर्यंत पोहोचवला.

डीएनए चाचणीसाठी गॅँगस्टर मुन्ना झिंगाडाचा नकार
SHARES

छोटा राजनच्या जबाबामुळेच दाऊदचा हस्तक मुजक्किर मुदस्सर हुसैन उर्फ मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचा निर्णय थायलंड न्यायालयाने दिलाया न्यायालयीन लढाईत पाकिस्तानकडून मुन्नाची दोन्ही मुले कराचीत शिकत असल्याचे पुरावे दिले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुन्नासह त्याच्या कुटुंबाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार पोलिसांनी मुन्नाच्या कुटुंबाची डीएनए चाचणी केली. मात्र, मुन्ना डीएनए चाचणीसाठी तयार नसल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहेमुंबईतील जोगेश्वरी इथं राहणाऱ्या मुन्ना झिंगाडावर भारतात ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.


ताब्यासाठी रस्सीखेच

छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला करणारा छोटा शकीलचा मुख्य हस्तक आणि दाऊद इब्राहिमचा विश्वासू मुन्ना झिंगाडा याचा ताबा मिळवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील अनेक वर्षांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. यात मुन्ना हा भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी अटकेत असलेला कुख्यात गुंड छोटा राजनचा जबाबही नोंदवून घेतला.


'आयएसआय'ची खेळी

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील पाकिस्तानात असून 'आयएसआय'च्या छत्रछायेखाली आहेत. छोटा राजनवर हाॅटेलमध्ये हल्ला करणाऱ्या मुन्नालाही आपल्या छत्राखाली आणण्यासाठी 'आयएसआय'ने ही चाल खेळल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 'आयएसआय'ने एका अज्ञात व्यक्तीमार्फत पाकिस्तानी पासपोर्ट मुन्नापर्यंत पोहोचवला. त्याच्याच आधारावर मुन्नाने तो पाकिस्तानी असल्याचा दावा केला. मुन्नाच्या मोठ्या  मुलाचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. तर दुसऱ्याचा जन्म हा मुंबईत झाला होता. ही दोन्ही सर्टिफिकेट जर न्यायालयात सादर झाली तर त्याची पोल खोल झाली असती. त्यामुळे तो पाकिस्तानी असल्याचा फक्त दावा करत होता. मात्र, त्याच्याकडे पुरावे काहीही नव्हते.

मुंबई पोलिस हतबल

मुन्ना हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा खोटा असल्याचं सिद्ध करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्याच्यावरील विविध गुन्ह्यांची कागदपत्रे सादर केली खरी. मात्र पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी बनावट कागदपत्रांद्वारे केलेल्या खेळीपुढं ती टिकू शकली नाहीत. त्यामुळेच अखेर पोलिसांनी मुन्नाच्या डीएनए चाचणीची मागणी उचलून धरली. त्यावेळी मुन्नाच्या घरातले अचानक बेपत्ता झाले होते. अखेर हे संपूर्ण कुटुंब पोलिसांना बहराइच येथे सापडले. या ठिकाणाहून नेपाळची सीमा खूपच जवळ आहे.

कुटुंबियांना भिती होती की पोलिस रक्ताचे नमुने घेऊन मुन्नासह त्याच्या कुटुंबियांनाही तुरुंगात टाकतील. अखेर पोलिसांनी मुन्नाची जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या बहिणीसह त्याच्या इतर कुटुंबियांची डीएनए चाचणी केली. मात्र, यावर आक्षेप नोंदवत मुन्नाने डीएनए चाचणी करण्यासाठी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मुन्नाचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांना आता काही काळ थांबावे लागणार आहे.


छोटा राजनचा जबाब

बँकाक इथं कुख्यात गुंड राजन निकाळजे उर्फ छोटा राजन याच्या अटकेनंतर अनेक नवनवीन खुलासे पुढे आले. राजनच्या जबाबामुळे झिंगाडा भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध झाल्यानंतर झिंगाडाला आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.


जबाबात पूर्ण तपशील

झिंगाडा भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध करण्यासाठी छोटा राजन विरोधातील आरोपपत्राची मदत घेण्यात आली आहे. या आरोपपत्रामध्ये दाऊद आणि झिंगाडाचे संबंध, २००१ मध्ये राजनवर झिंगाडाने केलेला हल्ला आणि मुंबईतील झिंगाडाचं वास्तव्य याबाबत सविस्तर माहिती राजनने आपल्या जबानीत दिली होती. पाकिस्तानने हा सर्व बनाव असल्याचं दाखवत झिंगाडाचा ताबा थायलंड न्यायालयाकडे मागितला होता.

राजनच्या आरोपपत्रातील संवाद आणि भारतातील झिंगाडाच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाचा आधार घेत थायलंड न्यायालयाने पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे झिॆगाडाचा ताबा मिळवणण्यासाठी भारताने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत.



हेही वाचा -

तर, मोदी, मल्ल्या होतील सख्खे शेजारी!

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा