ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. 'अय्यिलदीझ तिम' या तुर्कीश हॅकर्सच्या संघटनेनं अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक
SHARES

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. 'अय्यिलदीझ तिम' या तुर्कीश हॅकर्सच्या संघटनेनं अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक केलं आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं समजतं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली आहे.

सायबर हल्ला

अमिताभ यांचं ट्विटर अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी त्यांच्या अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलून तिथं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला. त्यानंतर अय्यिलदीझ तिम या संघटनेनं आइसलॅंडनं तुर्कस्तानच्या फुटबॉलपटूंना दिलेल्या वागणूकीचा निषेध केला. तसंंच, त्यांनी अमिताभ बच्चनच्या ट्विटर अकाउंटवर आपण सायबर हल्ला केला असल्याची माहिती देणारं ट्विट देखील केलं. या ट्विटनंतर पाकिस्तानला पाठिंबा देणारे आणि भारताचा निषेध करणारे काही ट्विटही या अकाउंटमार्फत करण्यात आले आहेत.


अकाउंट पूर्ववत होणार

ट्विटर अकाउंट हॅक झाल्यामुळं मुंबई पोलिसांनी तातडीनं महाराष्ट्र सायबर सेलला याबाबत माहिती दिली. सायबर सेल याप्रकरणी पुढील तपास करत असून लवकरच हे अकाउंट पूर्ववत होणार असल्याचं म्हटलं. मात्र, अमिताभ बच्चन यांच ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानं सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.हेही वाचा -

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

शिवडी अपघात प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांची आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची मागणीसंबंधित विषय