Advertisement

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा होत आहे. तसंच, ठाणे, दादरसह इतर स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

कोपर स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये ठिणग्या पडल्यानं सोमवारी रात्री मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत होण्याच कारण अद्याप समजलेलं नाही. परंतु, कल्याणहूनन मुंबईकडं येणारी वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीरानं सुरु आहे.

प्रवाशांचा खोळंबा

मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा होत आहे. तसंच, ठाणे, दादरसह इतर स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. त्यामुळं प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला उशीर होत असून, मोठी गैर सोय होतं आहे.

पावसाची जोरदार हजेरी

सोमवारी रात्रीच्या सुमारास मध्य रेल्वे मार्गावरच्या कोपर स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये ठिणग्या पडल्यानं धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळं लोकल स्टेशनवर पोहचण्यासाठी सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागत होता. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागांमध्ये सोमवारी पावसानं जोरदार हजेरी लावली. पाऊस पडत असल्यानं कल्याण, बदलापूरच्या काही भागांमध्ये लाईटही गेल्या होत्या.



हेही वाचा -

मुंबईत वीजांच्या गडगडाटासह दमदार पाऊस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा