Advertisement

शिवडी अपघात प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांची आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची मागणी

शिवडी कार अपघाताप्रकरणी सोमवारी जखमी व मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी केईएम रुग्णालयात आंदोलन केलं.

शिवडी अपघात प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांची आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची मागणी
SHARES

शिवडी कोर्ट नाका येथील जकेरीया बसथांब्याजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी हा अपघात घडला असून, या अपघातात चालकासह ७ जण जखमी झाले होतो. मात्र, कार अपघाताप्रकरणी सोमवारी जखमी व मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी केईएम रुग्णालयात आंदोलन केलं. मृत तरुणांच्या नातेवाइकांनी या मागणीसाठी रुग्णालयाच्या आवारात पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली होती.

जामीनपात्र गुन्हा

या प्रकरणी किडवई पोलिसांनी आयपीसी ३०४ ए, हा निष्काळजीपणाबद्दलचा जामीनपात्र गुन्हा दाखल केला. त्याच्यावर ३०४ बी, हा अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली होती. 'जोपर्यंत पोलीस अजामीनपात्र गुन्हा दाखल करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही', अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. अपघात झाला त्या वेळी इलियास बादी हा दारू पिऊन गाडी चालवत होता, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ‘या प्रकरणी तपास सुरू असून इलियास बादीच्या दारूसेवनासंदर्भातल्या चाचण्यादेखील करण्यात येत असल्याचं पोलिसांनी नातेवाईकांना  सांगितलं.

भरधाव वेगानं

रविवारी सायंकाळी शहाबाज इलियास बादी(२६) हा त्याच्या पत्नीसोबत कारमधून शिवडीतून माझगावच्या दिशेनं भरधाव वेगानं जात होता. या वेळी जकेरीया बंदरजवळ समोरच्या गाडीला ओव्हरटेक करताना शहाबाजचा गाडीवरचा ताबा सुटला. यामध्ये रस्त्याच्या कडेला बसस्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना त्यानं उडवलं. तसंच, समोर उभ्या असलेल्या ट्रकवर अर्टिगा गाडी आदळली. यामध्ये बसस्टॉपवर उभ्या असलेल्या दर्शन पाटील (१८)चा जागीच मृत्यू झाला, तर कल्पेश घार्गे (२५) या तरुणाचा केईएममध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याशिवाय अर्टिगा चालक इलियास बादी, त्याची पत्नी, स्वाती पाटील (४०), निधी पाटील (१२), गौरी नांदगावकर (४०), जय नांदगावकर (१३) हे सहा जण जखमी असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा