Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बेस्टची किंग्ज सर्कल परिसरात मोफत सेवा

'ज्या ठिकाणी दुरूस्तीसाठी पूल बंद करण्याच आले आहेत, त्या ठिकाणी ५ किलोमीटरपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा' देण्याचे आदेश मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बेस्टची किंग्ज सर्कल परिसरात मोफत सेवा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर महापालिकेनं  जूने आणि धोकादायक पूल दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला. तसंच, रेल्वेनं देखील मार्गावरील अनेक पूल दुरुस्तीसाठी बंद केले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून चाकरमान्याचे हाल होत आहेत. त्यामुळं प्रवाशांची गैर सोय होऊ नये यासाठी, 'ज्या ठिकाणी दुरूस्तीसाठी पूल बंद करण्याच आले आहेत, त्या ठिकाणी ५ किलोमीटरपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा' देण्याचे आदेश मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बेस्टनं किंग्ज सर्कल परिसरात प्रवाशांसाठी मोफत प्रवास सुविधा सुरू केली आहे. एमटीएनएल बिल्डिंग ते गांधी मार्केटपर्यंत बेस्टनं ही सेवा सुरू केली आहे. 

२ पूल बंद

एमटीएनएल बिल्डिंग ते गांधी मार्केट या परिसरातील २ पूल दुरुस्तीकरीता बंद करण्यात आले आहेत. तसंच, गांधी मार्केट असल्यानं या भागात नेहमीच चाकरमान्यांची वर्दळ असते. त्यामुळं येथील रहिवाशांची प्रचंड गैर सेय होत आहे. त्यासाठी बेस्टनं गुरुवारी दुुपारी ४ वाजताच्या सुमारास ही सेवा सुरू केली. 

२९ पूल धोकादायक

महापालिकेनं मुंबईतील सर्व पूलांचं स्ट्रक्चरल अॉडिट केलं. या ऑडिटनुसार मुंबईतील २९ पूल धोकादायक असल्यामुळं वापरासाठी बंद करण्यात आले. तसंच, यामधील काही पूल पालिकेनं तोडले आहेत. त्यामुळं पावसाळ्यात मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जाव लागणार आहे. परंतु, बेस्टच्या या सुविधेमुळं प्रवाशांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा -

कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण, मुंबईसह राज्यभरात निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांचं आंदोलन

वांद्र्यात समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यूRead this story in हिंदी or English
संबंधित विषय